नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्यासाठी २७ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे जय शाह यांची बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह १ डिसेंबर २०२४ रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. जय शाह यासह आयसीसी अध्यक्षपदी निवड होणारे एकूण पाचवे तर पहिले सर्वात युवा भारतीय ठरले आहेत. जय शाह यांना वयाच्या ३५ वर्षी ही जबाबदारी मिळाली आहे.
ग्रेग बार्कले हे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. बार्कले यांची ही अध्यक्षपदाची दुसरी टर्म आहे. त्यांचा कार्यकाळ हा ३० नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र त्यांनी तिसऱ्या टर्मबाबत नकार दिला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अर्ज मागवण्यात आले. आता आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची आजचा (२७ ऑगस्ट) शेवटची तारीख होती. मात्र जय शाह यांच्या व्यतिरिक्त कुणीही अर्ज केला नाही. त्यामुळे आता जय शाह हे आयसीसीचे बॉस असणार आहेत. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.