निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून आम्ही जनतेच्या माध्यमातून निपाणी जवाहर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम रबावित आहोत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा सहाव्या वर्षी ही स्वच्छता मोहीम रविवार (ता.१९) पासून प्रत्येक रविवारी राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे यांनी केले आहे.
सध्या शिरगुप्पी ओढ्यातून येणाऱ्या पाण्याच्या मार्गावर अनेक काटेरी झाडे झुडपे वाढले आहेत. शिवाय काही नागरिकांनी ओढ्यात टाकाऊ वस्तु टाकल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी तलावात येण्यासाठी अडचण निर्माण होते. त्यामुळे तलाव परिसर स्वच्छतेचे मोहीम हाती घेतली आहे.यावर्षी अचारसंहिता असल्यामुळे आम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होऊ शकलो नाही. तरीही आमचे काम चालू आहे.कोणत्याही प्रकारचा गजावाजा न करता रविवारी सकाळी ८ वाजता या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा अशी दोन तास ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळीही आपण मदत कराल अशी अपेक्षा लोकरे यांनी व्यक्त केली.