बेळगाव : हिंदू देवदेवतांच्या भग्न प्रतिमांचे अपमान टाळण्यासाठी सांबरा विमानतळ प्रवेशव्दार रस्त्यावर मधोमध असलेल्या वडाच्या झाडाखाली पाच पोती भग्न मूर्ती, फोटो, तुटक्या प्रतीमा जायंटस् संस्थेच्या वतीने जमा करण्यात आल्या. देशांतर्गत आणि विदेशांतील प्रवाशांच्या नजरेस येत होत्या. नागरिकानी भग्न प्रतिमांचा अपमान करू नये त्या विधीवत विसर्जित कराव्या आणि त्याचे पावित्र्य राखावे असे परिसरात जनजागृती करताना जायंटस् अध्यक्ष अविनाश पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच विमानतळ व्यवस्थापक त्यागराजन यांची भेट घेवून परिसर स्वच्छ ठेवण्याची विनंती केली. यावेळी जायंटस् माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, विजय बनसूर, प्रदीप चव्हाण, आनंद कुलकर्णी परिसरारील नागरीक उपस्थित होते.