निपाणी (वार्ता) : अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे निपाणी परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना आधार म्हणून नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने आर्थिक मदत देण्यात आली.
सुनील पाटील म्हणाले, वादळी वारे व पावसामुळे निपाणी शहराबरोबरच परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून सर्व्हे करताना अनेक नियम व अटींचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे सरकारी मदत मिळेपर्यंत सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांच्या सहकार्याने ही तात्काळ मदत केली आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या माध्यमातून शासकीय मदतही मिळवून देणार असल्याचे सांगितले.
मल्लिकार्जुन गडकरी, दयानंद कोठीवाले, संजय मोळवाडे, रवींद्र शेट्टी, डॉ. महेश ऐनापुरे, नगरसेवक राजू गुंदेशा, बंडुलाल गुजर, बाळासाहेब जाधव, अभय सौंदलगेकर, शंकर वालीकर, अमोल चंद्रकुडे, शिवाजी खोत यांच्या हस्ते मदत देण्यात आली.
यावेळी बाळकृष्ण वसेदार, अरुण भोसले, शिवानंद बोरगल्ले, रवींद्र चंद्रकुडे, सोमशेखर कोठीवाले, सुनील वसेदार, रावसाहेब पाटील, विलास शिंदे यांच्यासह गणेश मंडळ व एसपी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.