चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुधगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकसंबा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एकसंबा -दत्तवाड परिसरातील शेतकरी आपली जनावरे अन्यत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दुधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे एकसंबा-दत्तवाड परिसरातील जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहेत.