बँकेच्या स्वतःच्या जागेत लवकरच इमारत उभारणार!
खानापूर : खानापूर तालुक्यातील भू- धारक शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज व शासनाच्या सुविधा उपलब्ध करून तालुक्यात एक आदर्श बँक निर्माण करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने हाती घेतला आहे. ग्राहकांनी दिलेल्या सहकार्यातून 2023- 24 आर्थिक वर्षात 46.23 लाखाचा नफा बँकेने मिळवला असल्याची माहिती खानापूर पीएलडी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांनी शनिवारी खानापूर येथील केदार मंगल कार्यालयात आयोजित 56 व्या सर्वसाधारण बैठकीत दिली.
यावेळी ते बँकेच्या प्रगती विषयी बोलताना म्हणाले, कर्नाटक सिद्धरामय्या सरकारने जाहीर केलेल्या थकीत कर्जावरील व्याजमाफीच्या धोरणात 86 लाखाची व्याजमाफी मिळून देण्यात बँक यशस्वी ठरली आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने जवळपास 18 कोटीची उलाढाल केली आहे. बँकेची कर्ज मर्यादा 10 लाख होती, ती 15 लाखावर मंजूर करून तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न बँकेने हाती घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष आय. आर. घाडी, समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमा संदर्भात तसेच ग्राहकांच्या अडीअडचणी संदर्भात सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वनाथ डिचोलकर, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपा माजी अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी अध्यक्ष विजय कामत आदींनी यावेळी विचार मांडले. व त्यांचा सत्कारही करण्यात आला.
व्यासपीठावर भाजपाचे प्रदान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ, गुंडू तोपीनकट्टी यासह संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. एम. पाटील, संचालक एस. बी. पाटील, ए. बी. पाटील, आर्, एस. पाटील, एस. एन. गुरव, एन. एन. पाटील, एस. एल. गावकर, व्ही. पी. कुंभार, के. यु. बीच्चनावर, सौ. एल. एस पाटील, श्रीमती एस एस मडवालकर, आदी उपस्थित होते. सभेत प्रस्ताविक स्वागत संचालक एन. एन. पाटील यांनी केले. अहवाल वाचन संचालक सुदीप गौड यांनी तर ठरावाचे वाचन सुधीर कुलकर्णी यांनी केले. आभार सुनील चौगुले यांनी मांडले. सभेला 500 हून अधिक सभासद उपस्थित होते.