Monday , September 21 2026
Breaking News

दसऱ्याची सुट्टी 3 ते 20 ऑक्टोबरपर्यंत!

Spread the love

 

बेंगळुरू: चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये, सार्वजनिक शिक्षण विभागाने कर्नाटकातील सरकारी आणि खाजगी शाळेतील मुलांसाठी 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दसऱ्याची सुट्टी जाहीर केली आहे.
कर्नाटकातील सर्व शाळांचे शैक्षणिक वर्ष मे पासून सुरू झाले. पहिला कालावधी 2 ऑक्टोबरपर्यंत असेल. 23 सप्टेंबर ते महिनाअखेरीपर्यंत मध्यावधी परीक्षा होणार आहे. त्यानंतर दसऱ्याची सुट्टी 2 ऑक्टोबर रोजी सर्व शाळांमध्ये गांधी जयंती साजरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून असेल.
3 ते 20 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच 17 दिवसांची सुट्टी मिळेल. 2रा कालावधी 21 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत चालेल. 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची मार्गदर्शक तत्त्वे सार्वजनिक शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या नियमांनुसार घोषित केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *