Wednesday , April 22 2026
Breaking News

हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात पूर्व वैमनस्यातून खून

Spread the love

 

बेळगाव : पूर्व वैमनस्यातून खून करून अपघात भासवण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीला यमकनमर्डी पोलिसांनी अवघ्या 24 तासात शिताफीने अटक केल्याची माहिती एसपी भीमाशंकर गुळेद यांनी दिली. सदर खून हुक्केरी तालुक्यातील होसूर गावात घडला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पूर्व वैमनस्यातून विठ्ठल जोत्याप्पा रामगोनट्टी (वय 60) या व्यक्तीच्या अंगावर कार घालून त्यांचा खून करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात पाठवला. प्रारंभी हा अपघात असे वाटत होते. मात्र सखोल तपासनानंतर तो खून असल्याचे निष्पन्न झाले.
यासंबंधी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी हा अपघात नसून खून असल्याची माहिती दिली. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी यमकनमर्डी पोलीस ठाण्यांतर्गत होसूर आणि इंगलगी गावादरम्यान दुचाकी आणि इंडिका कार यांच्यात अपघात झाल्याची नोंद आहे. या प्रकरणाचा तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचे सिद्ध झाले. अवघ्या 24 तासांत आरोपीला जेरबंद करण्यात यमकनमर्डी पोलिसांना यश आले आहे. 2 एकर 35 गुंठे जमिनीच्या अतिक्रमणाच्या प्रकरणावरून रामगोनट्टी आणि मुस्लिम कुटुंबात वाद झाला होता. तसेच काल होसूरच्या ज्येष्ठांची बोलणी बैठक झाली. बैठकीतून परतत असलेल्या विठ्ठल यांना दुचाकीचा अपघात घडवून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातच विठ्ठल यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी लाइटनिंग ऑपरेशन करून 24 तासांत रायबागमध्ये कार ताब्यात घेऊन आरोपी लाझमी आणि सद्दामला अटक केली. यमकनमर्डी पोलिसांचे बेळगावचे जिल्हा अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *