Friday , October 18 2024
Breaking News

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा बेळगावात?

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शताब्दी महोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. याबाबत राज्याचे कायदा व संसदीय खात्याचे मंत्री एच. के. पाटील यांनी बंगळूर येथील एका कार्यक्रमात सूतोवाच केले आहे. डिसेंबरमध्ये अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे.

बराक ओबामा यांनी महात्मा गांधींबाबत बोलताना, गांधीजी हे केवळ भारताचे नसून गांधीजी हे जागतिक स्तरावरील नेते असल्याचे अनेकदा सांगितले आहे. यामुळे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीद्वारे बेळगावात आयोजित करण्यात येणाऱ्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमास ओबामा यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मंत्री के. एच. पाटील यांनी सांगितले आहे. बेळगावात २६ डिसेंबर १९२४ रोजी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ३९ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. येथे झालेल्या या अधिवेशनावेळी तत्कालीन राष्ट्रीय स्तरावरचे नेते या ठिकाणी आले होते. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेले हे काँग्रेसचे पहिले आणि अखेरचे अधिवेशन ठरले होते. या ऐतिहासिक घटनेला २६ डिसेंबर २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत.

काँग्रेस अधिवेशनाचा हा शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. बराक ओबामा यांचा बेळगाव दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यास या अधिवेशनाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळणार आहे. तसेच बेळगावचे नावही जागतिक स्तरावर चमकणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

भामट्याने लांबवली वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी

Spread the love  बेळगाव : केबल टेक्निशियन असल्याचे सांगून घरात शिरलेल्या एका भामट्याने वृद्ध महिलेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *