Friday , October 18 2024
Breaking News

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 ते 2 ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला. प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा दक्षिण मध्यक्षेत्राने पूर्व पश्चिमक्षेत्राचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाच्या निधीशा दळवीने एकमेव गोल केला.
माध्यमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतील संत मीरा दक्षिणमध्यक्षेत्राने पूर्वक्षेत्र पंजाबचा 1-0 असा पराभव केला. विजयी संघाच्या दीपिका रियांगने एकमेव गोल केला. वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या जम्मू कश्मीर व महाराष्ट्र येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
वरील फुटबॉल खेळाडूंचे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, गटशिक्षणअधिकारी रवी बजंत्री, एस पी दासपणावर, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, अशोक शिंत्रे जाहिदा पटेल, साधना बद्री, प्रकाश पाटील, उमेश कुलकर्णी, आर पी वंटगुडी, डॉ. नवीन शेट्टीगार, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचे अभिनंदन व सत्कार तसेच आगामी होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच संघाला गणवेश दिल्याबद्दल ओमकार देसाई याचे अभिनंदन करण्यात आले. या संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी, शामल दड्डीकर, प्रेमा मेलीनमनी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजेत्या प्राथमिक 14 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार निधीशा दळवी, उपकर्णधार समीक्षा खन्नूरकर, श्रेया लाटुकर, हर्षदा जाधव, समृद्धी कोकाटे, धनश्री जमखंडीकर, राधा धबाले, कल्याणी हलगेकर, अनन्या रायबागकर, सिंचना तिगडी, हर्षिता गवळी, समृद्धी घोरपडे, सृष्टी सातेरी, आदिती सुरतेकर, अद्विता दळवी, कनिष्का हिरेमठ कृतिका हिरेमठ, तर माध्यमिक 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार चैत्रा इमोजी उपकर्णधार दीपा बिडी, अंजली चौगुले, ऐश्वर्या शहापूरमठ, चरण्या एम, भावना कौजलगी, सृष्टी बोंगाळे, किर्तीका लोहार, दीपिका रेंग, मोनिता रेंग, अमृता मलशोय, सान्वी पाटील, संस्कृती भंडारी, जिया बाचीकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेश दूध केंद्राचा उद्या वर्धापन दिन

Spread the love  बेळगाव : उचगाव क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचा १० वा वर्धापन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *