Tuesday , December 3 2024
Breaking News

शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; चंदगडमधून नंदाताई बाभूळकर

Spread the love

मुंबई : शरद पवार गटाने दुसरी यादी जाहीर केली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी आता एकूण 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत बीडमध्ये संदीप क्षिरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर उल्हासनगरमधून ओमी कलानी यांना उमेदारी मिळाली आहे.

छगन भुजबळ यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात
नाशिकच्या येवला मतदारसंघातून शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकेकाळी भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि शरद पवारांचे समर्थक असलेल्या माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने येवला-लासलगाव मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होणार आहे. माणिकराव शिंदे यांनी 2014 साली शिवसेनेकडून छगन भुजबळ यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

शरद पवार गटाची दुसरी यादी

1. एरंडोल – सतीश अण्णा पाटील

2. गंगापूर – सतीश चव्हाण

3. शहापूर – पांडुरंग बरोरा

4. परांडा – राहुल मोटे

5. बीड – संदीप क्षीरसागर

6. आर्वी – मयुरा काळे

7. बागलान – दीपिका चव्हाण

8. येवला – माणिकराव शिंदे

9. सिन्नर – उदय सांगळे

10. दिंडोरी – सुनीता चारोस्कर

11. नाशिक – पूर्व गणेश गीते

12. उल्हासनगर – ओमी कलानी

13. जुन्नर – सत्यशील शेरकर

14. पिंपरी- सुलक्षणा शीलवंत

15. खडकवासला – सचिन दोडक

16. पर्वती – अश्विनीताई कदम

17. अकोले – अमित भांगरे

18. अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर

19. माळशिरस – उत्तमराव जानकर

20. फलटण – दीपक चव्हाण

21. चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर

22. इचलकरंजी – मदन कारंडे

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

Spread the love    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *