Wednesday , December 4 2024
Breaking News

महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला

Spread the love

 

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात

महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच शिवाजी पार्क रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती समोर आली होती. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येत होता. तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांचीदेखील चाचपणी सुरू होती. मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर धुडकावल्या..

Spread the love  मुंबई : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रि‍पदाची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *