वीसहून अधिक जण जखमी
बेळगाव : लिंगायत पंचमसाली समाजाला २अ आरक्षणाच्या मागणीसाठी सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी २० हून अधिक आंदोलक जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
बेळगाव – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येने जमलेले पंचमसाली समाजबांधव सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. श्री बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनाही पोलिसांनी अटक केली. यावेळी झालेल्या दगडफेक आणि लाठीचार्जमध्ये वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत.
बेळगाव – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हजारो समाजबांधव जमले असून, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस पुढे आले मात्र परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमारामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.