Friday , January 10 2025
Breaking News

नितीश रेड्डीचे पहिले कसोटी शतक! ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर एकटा उभा ठाकला; वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

Spread the love

 

 

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा नितीश कुमार रेड्डी खंबीरपणे उभा राहिला. आपली पहिलीच कसोटी मालिका खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने मालिकेत आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावले नव्हते, मात्र त्याने ४२, ४२ धावांची बहुमूल्य खेळी केली होती.

आता मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघ बॅकफूटवर असताना त्याने शानदार शतकी खेळी केली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

नितीश कुमार रेड्डी ज्यावेळी फलंदाजील आला त्यावेळी भारतीय संघाचा डाव फसलेला होता. त्याने रविंद्र जडेजासोबत मिळून ३० धावांची भागीदारी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला. दोघांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.

या जोडीने ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना ८ व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. नितीश कुमार रेड्डीने आपलं शतक पूर्ण केलं, तर वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी केली.

नितीश कुमार रेड्डीचं शानदार शतक
आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथा सामना खेळत असलेल्या नितीश कुमार रेड्डीने संयमी खेळी करत १७६ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंच शतक ठरलं आहे. या शतकी खेळीसह तो ऑस्ट्रेलियात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकी खेळी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
यापूर्वी कुठल्याही भारतीय फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता. दरम्यान त्याच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना शतकी खेळी करणारा तिसरा सर्वात युवा भारतीय फलंदाद ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना शतकी खेळी करणारे युवा भारतीय फलंदाज

* सचिन तेंडुलकर, सिडनी १९९२

१८ वर्ष, २५३ दिवस

* रिषभ पंत – सिडनी, २०१९

२१ वर्ष, ९१ दिवस

* नितीश कुमार रेड्डी, मेलबर्न, २०२४

२१ वर्ष, २१७ दिवस

* दत्तू फडकर, ऍडलेड १९४८

२२ वर्ष, ४२ दिवस

About Belgaum Varta

Check Also

अश्विनचा पंजा, टीम इंडियाचा धमाकेदार विजय, बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा

Spread the love  चेन्नई : टीम इंडियाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *