Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात २८, २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात दि. २८ आणि २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला जुन्या इतिहासाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने दि. २८ व २९ डिसेंबर रोजी महावीर भवन येथे जुन्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून क्लब सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्यांनी शासकीय शाळेत मुलभूत सुविधा पुरविण्यातही मदत केली आहे. त्याचबरोबर, २६ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार असून,

त्यातून जमवलेल्या पैशाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला जाईल. जुन्या नाण्यांच्या प्रदर्शनासाठी शाळा व महाविद्यालयांना मोफत पास वितरित करण्यात आले आहेत, जेणेकरून विद्यार्थी व नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थ्यांनी व जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *