खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड गाववाजवळ स्विप्ट कारची झाडाला जोराची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. सदर युवक खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावचा असून याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हिरेहट्टीहोळी येथील युवक राहुल चंद्रकांत हणबर (वय १९) हा आपल्या मित्रासोबत खानापूरात गाडी रिपेरीसाठी सोडली होती. रिपेरी झाल्यानंतर रात्रीच 8.30 वाजण्याच्या सुमारास कार घेऊन गावी जाताना पारिश्वाड गावाजवळील मशिदच्या वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्विप्ट कार झाडावर जोराने धडकली. त्यात राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र मित्र विनायक पुजार (वय १८) हा किरकोळ जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश सिंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
लागलीच मृत्यदेहाची उत्तर तपासणी करून मृत्यू नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
राहुल हा एकूलता एक मुलगा होता. त्याचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. त्याच्या मृत्यूने हिरेहट्टीहोळी गावावर शोककळा पसरली आहे.
