तहसीलदार कार्यालयासमोर धरणे
खानापूर : लेबर कार्डधारकांना रेशन कीट देण्याऐवजी इतर लोकांना सरकारकडून आलेले रेशन किट वितरित करीत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे बैलुर, कामगारासह यांनी खानापूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले होते.
या आंदोलनाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठींबा व्यक्त करण्यात आला व तहसीलदार कार्यालय येथे सुरू असलेल्या आंदोलनात भाग घेतला.
खानापूर तालुक्याच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी रेशन कीट वितरित करण्यास सुरूवात केली असली तरी दुसऱ्या दिवसापासून रेशन कीट संपल्यामुळे लोकांना याचा नाहक त्रास होत असुन लोकांची आज या उद्या या म्हणून पळापळी केली जात आहे, तसेच रेशन कीट वितरणाचे योग्य नियोजन नसल्याने काही लोकांना दोन दोन वेळा कीट देण्यात आले आहेत.
अनेक लेबर कार्ड असलेल्या लोकांना अजून एकही किट देण्यात आलेले नाही. खानापूर तालुक्यात जवळजवळ १२००० कामगार कार्डधारक आहेत पण सरकारमार्फत केवळ २५०० रेशन किट खानापूर तालुक्यातील लेबर कार्डधारकांना दिलेत उर्वरित कार्डधारक कामगार व पहिला दिलेल्या कामगार कार्ड २५०० किटची सखोल चौकशी व्हावी, यावेळी नगरसेवक लक्ष्मण मादार व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील व सदस्य यांनी तहसिलदार रेश्मा तालिकोटी व जिल्हा ऑफिसर कामगार कार्ड यांना निवेदन दिलं.
आंदोलन दरम्यान दिलेल्या निवेदनात विनंती केली की उर्वरित कार्डधारकांना लवकरात लवकर रेशन किट उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.