खानापूर (प्रतिनिधी) : गावाला गायरान नाही, गावठान नाही. शेतकऱ्याच्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावित असतानाच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात कचरा डेपो सक्तीने उभारण्यात येत आहे.
असाच प्रकार खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्राम पंचायत हद्दीतील जागेवर कचरा डेपो लवकरच उभारण्यात येणार आहे.
या कामाचा शुभारंभ तालुका पंचायत कार्यनिवाहक अधिकारी प्रकाश हल्लपणावर यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्वच्छता अभियानातून तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून कचरा डेपो योजनेचा प्रारंभ होणार आहे. यापैकी ११ ग्राम पंचायतीमधून कचरा डेपो कामाची प्रगती चालु आहे. उर्वरित ग्राम पंचायतीतून लवकरच कचरा डेपो योजना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गावातील कचरा, प्लॅस्टिक, इतर घाण बाहेर जाणार व गावात स्वच्छता राखली जाणार अशी माहिती दिली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सुनिल प्रभू, ज्येष्ठ नागरिक रणजित देसाई, पीडीओ आर. पी. पाटील, गीवचे नागरीक उपस्थित होते.
- प्रतिक्रिया
गावात कचरा डेपो झाल्याने गावाच्या गायरानातील जागेवर कब्जा करून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न प्रशासनाने उभा केला. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी पसरली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी कचरा डेपोला विरोध होता.
– एक शेतकरी - प्रतिक्रिया
गावकऱ्यांनी कचरा डेपोला कितीही विरोध केला. तरी पण पोलिस संरक्षण घेऊन प्रत्येक ग्राम पंचायत क्षेत्रात कचरा डेपो उभारण्यात येणारच
श्री. देवराज, तालुका पंचायत एडी