खानापूर प्रतिनिधी) : चारशे कोटी रूपयाची उलाढाल, २०० कोटी रूपये एफ डी, १६० कोटीचे कर्ज वाटप अशी प्रगती साधत न्यूनवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट येळ्ळूरच्या सोसायटीने प्रगती साधली आहे. त्यामुळे खानापूरात सोसायटीला आदराचे स्थान आहे. असे विचार शिवशक्ती सोयाटीचे संस्थापक शंकर पाटील यांनी खानापूर शाखेच्या १६ वा वर्धापनदिनी शनिवारी साजरा करताना व्यक्त केले. व त्यांच्याचहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तर उद्योजक नागराज कलबुर्गी यांच्याहस्ते लक्ष्मी फोटो पुजन, तर चेअरमन डी. पाटील यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल उपस्थित होते.
प्रारंभी संचालक अनंत पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी संजय कुबल, शंकर पाटील, व्यापारी बाबूराव अगणोजी आदिंनी विचार मांडले.
कार्यक्रमाला संचालक श्री. कंग्राळकर, शाखेचे कर्मचारी वर्ग व ग्राहक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक ए. ए. पाटील यांनी केले. तर आभार डेव्हलमेंट ऑफिसर छत्रपती पाटील यानी मानले.
