बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मल्लाप्पा कुंडेकर हे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष कृष्णा तुळजाई व सचिव संतोष पवार उपस्थित होते.
संतोष पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. एस. एस. वेसणे यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेतला. मल्लाप्पा कुंडेकर, पी. ए. पाटील, बी. एल. कानशिडे, पी. जे. घाडी, बी. एम. पाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गत 2018-19 ते 2020-21सालच्या अहवाल, ताळेबंधाचे वाचन संतोष पवार यांनी केले व यास मंजुरी घेण्यात आली.
सन 2021-22 ते 2022-23 सालाकरिताच्या कार्यकरिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष -मनोज पवार, उपाध्यक्ष -संतोष पवार, सचिव -अमृत मिरजकर तर सदस्य म्हणून आप्पाजी कुगजी, एस. एस. वेसणे, पी. जे. घाडी, अशोक मुचंडी, आर. एम. निलजकर , श्रीपाद रेवणकर, कृष्णा तुळजाई, पी. ए. पाटील, मल्लाप्पा कुंडेकर, चंद्रकांत धुडुम, बी. एम. पाखरे, बी. टी. गिंडे, महेश करटे, बाळू तम्मुचे, बी. एल. कानशिडे, किरण करंबळकर, एम. जि. सुतार, मनोहर धामणेकर, शंकर नंदी, अविनाश निकम आदींची निवड करण्यात आली.
बी. एम. पाखरे यांनी आभार मानले.
Check Also
कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या “समीक्षा” ग्रंथास पुरस्कार जाहीर
Spread the love बेळगाव : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा-वारणानगर च्या वतीने “स्व. विलासराव कोरे संकीर्ण …