बहुसंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवाहन खानापूर : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन आगामी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी व मराठी भाषिकावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीकडे …
Read More »ट्रॅक्टरच्या चाकात सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू
अथणी : अथणी तालुक्यातील तेवरट्टी गावात आज ट्रॅक्टरच्या चाकात सापडून सात वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. सुदर्शन निलजगी (७) असे मयत बालकाचे नाव आहे. आज सकाळी मुलगा मामासोबत ट्रॅक्टरने शाळेसाठी निघाला होता. शाळा आल्यानंतर तो शाळेत जाण्यासाठी खाली उतरत ट्रॅक्टरची धडक बसून मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना …
Read More »रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास उपोषण; संतप्त नागरिकांचा इशारा
उत्तम पाटील युवाशक्तीतर्फे तात्पुरती डागडुजी निपाणी (वार्ता) : बोरगाव ते इचलकरंजी, कुरुंदवाड, बेडकिहाळ, हुपरी तथा अन्य मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अडचणीचे ठरले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नगरसेकांसह नागरिकांनी दिला आहे. बोरगाव येथे उत्तम पाटील …
Read More »हिंदवाडीतील लिंगायत स्मशानभूमीत अज्ञात महिलेचा मृतदेह
बेळगाव : शहापूर हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह उघड्यावर फेकून देण्यात आल्याची घटना आज सकाळी भाजप नेते किरण जाधव यांच्यामुळे उघडकीस आली. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदू स्पोर्ट्स जलतरण तलावाच्या ठिकाणी भाजप युवा नेते किरण जाधव दररोज पोहणे व चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जातात. …
Read More »अपघातात जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन
बेळगाव : अपघातात जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान मंगळवार दिनांक 7 रोजी निधन झाले. हलगा येथील प्रवीण अरुण मास्तमर्डी असे या युवकाचे नाव आहे. प्रवीण अरुण मास्तमर्डी (वय 34) या युवकाचा अपघात झाला होता. त्याला अधिक उपचार करता दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवार दिनांक 7 रोजी …
Read More »महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी निवेदन
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरामध्ये महापुरूषांचे लहान मोठे पुतळे आणि चौक आहेत. त्या स्थळावर नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या नावाचे फलक लावण्यासाठी कार्य लिहावे. तेथील परिसर दररोज स्वच्छ व सुंदर ठेवावा. महापुरुषांचा एकेरी भाषेमध्ये होणारा उल्लेख टाळावा. यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी नगरपालिकेने प्रयत्न करावे. अन्यथा श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने …
Read More »क्रांतीज्योती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील क्रांतीज्योती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अँड. शितल शिप्पुरकर होत्या. प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्रियांनी हक्क व तरतुदी यांची माहिती करून …
Read More »निपाणीचे नगरसेवक शौकत मनेर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या राजस्थान येथील बडीखाटू जायल येथील संत कबीर आश्रम सेवा संस्थान यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन निपाणीतील नगरसेवक शौकत मनेर यांना गौरवण्यात आले. मनेर यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार 5 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय …
Read More »खानापूर म. ए. समितीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
उमेदवारीसाठी अर्जाचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समिती खानापूर तालुकातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकाकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहे. १० फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत अर्जासाठी आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या निकालाच्या अंतिम क्षणी सर्वजण म. ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र राहून येणारी विधानसभा निवडणूक जिंकणे …
Read More »नवहिंद महिला प्रबोधन संघ व प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटी यांच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात
येळ्ळूर : आपली मुले सुसंस्कृत होण्यासाठी त्यांना दररोज अभ्यासाला प्रोत्साहन केले पाहिजे. त्यांच्याकडून घरातील सर्व प्रकारची कामे करून घेतली पाहिजे. स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन मोठ्यांचा आदर करणे शिकवले पाहिजे, असे विचार हळदीकुंकू -महिला मेळाव्यात निवृत्त शिक्षिका सौ. आशा रतनजी यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधन संघाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta