Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

एपीएमसी व्यापाऱ्यांचा आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना एपीएमसी मार्केट यार्ड येथील कांदा, बटाटा वगैरे समस्त व्यापारीवर्गाने संपूर्ण जाहीर पाठिंबा दिला असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी …

Read More »

मुरलीधर पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुक्याचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर पाठिंब्याचे पत्र पाठविण्यात आले असून यामध्ये, आजवर ज्यापद्धतीने कर्नाटकातील मराठी सीमाबांधवांच्या पाठीशी एकजुटीने सर्व शक्तीनिशी उभा राहिला आहे. आगामी कर्नाटक विधानसभा …

Read More »

अनिल बेनके साहेब मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा : आम. रोहित पवार यांचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्रामध्ये आम्ही कन्नड मराठी दुजाभाव कधीच करीत नाही. मात्र बेळगावमध्ये मराठी भाषा संपवण्याचे षडयंत्र सरकारने रचले आहे. आमदार अनिल बेनके साहेब राष्ट्रीय पक्षात राहून मराठी माणसावर होणारा अन्याय तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागत आहे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा, अशी साद राष्ट्रवादीचे …

Read More »

दक्षिणेत घुमला रमाकांत कोंडुसकर यांचा आवाज!

  बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांची प्रचार फेरी शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता सुरूवात झाली. पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन करून पदयात्रेला जुने बेळगाव व खासबाग नाका येथून संपूर्ण जुने बेळगाव आणि वडगाव विभागीय पहिल्या …

Read More »

कंटेनर-दुचाकी अपघातात महिला जागीच ठार

  बेळगाव : अलतगा जत्रेला जाऊन परतताना एपीएमसी रोडवरील संगमेश्वर नगर येथील ड्यामरो शोरुम जवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात 1 महिला जागीच ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडली आहे. अपघातग्रस्त दोघेही रामदेव गल्ली बेळगाव येथील रहिवासी आहेत. सदर अपघातात छाया नागाप्पा भिसे (वय ६०) ही महिला कंटेनरखाली सापडल्याने जागीच ठार झाली …

Read More »

क्रांती घडवण्यासाठी शेवटपर्यंत लढा : आमदार रोहित पवार

  आमदार रोहित पवार : उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा निपाणी (वार्ता) : भ्रष्टाचारांच्या विरोधात क्रांती घडवायचे असेल तर शेवटपर्यंत लढावे लागेल. त्यामध्ये कंटाळा करता कामा नये. गेल्या दहा वर्षात मंत्री पद भोगूनही अनेक कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी आता अंडी घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा …

Read More »

वाणी मठ परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील

उत्तम पाटील : कार्यकर्त्यांशी साधला संवाद निपाणी (वार्ता) : शहराबरोबर उपनगराचेही अजूनही अनेक समस्या तशाच आहेत. त्याच्या सोडवणुकीडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भविष्यात या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथील …

Read More »

अरिहंत संस्थेचे ११०० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण 

संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : ९.७२ कोटीचा नफा बोरगाव : सहकार क्षेत्रासह  सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन नफा कमविण्याचा उद्दिष्ट बाजूला ठेवून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था कार्यरत आहे. संस्थेत ११०० कोटी  इतक्या ठेवी असून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ९३८ कोटी  इतके कर्ज वाटप करून आर्थिक वर्षात ९ कोटी ७२ लाख ९३ …

Read More »

निजद उमेदवार राजू पोवार यांच्या प्रचाराचा झंझावात

  मतदारसंघातील विविध गावांना भेटी; मतदारांचा वाढता प्रतिसाद निपाणी (वार्ता) : विधानसभा मतदारसंघातील निधर्मी जनता दल पक्षाचे अधिकृत उमेदवार व रयत संघटना चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी वेळोवेळी शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे आंदोलने प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन आपली वेगळी छाप निपाणी विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेली आहे. यासाठी …

Read More »

प्रियंका गांधी यांची खानापुरात उद्या जाहीर सभा!

खानापूर : खानापूर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर व …

Read More »