बेळगाव : बेळगावमधील अत्यंत चुरशीने निवडणूक लढविला जाणारा मतदार संघ म्हणून दक्षिण मतदार संघाची ओळख निर्माण झाली आहे. या मतदार संघात राष्ट्रीय पक्षांना ‘टफ फाईट’ देण्यासाठी तोडीस तोड असाच उमेदवार निवडणे गरजेचे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली दक्षिण विनसभा मतदार संघातून रमाकांत कोंडुसकर यांनी उमेदवारी मागितली असून रमाकांत कोंडुसकर …
Read More »शिवसेना सीमाभागतर्फे शिव पुण्यतिथी गांभीर्याने
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने आज गुरुवारी सकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी गांभीर्याने आचरणात आणण्यात आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्याद्वारे बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावतीने शिव पुण्यतिथी गांभीर्याने आचरणात आणण्यात आली. यावेळी …
Read More »हुतात्मा स्मारकासाठी जागा न मिळाल्यास आंदोलन
प्रा. सुभाष जोशी : तंबाखू आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : तंबाखू आंदोलनात १२ शेतकरी हुतात्मा झाले आहेत. त्यांचे बलिदान येणाऱ्या पिढीला समजण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी स्मारक उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला अजूनही मूर्त स्वरूप प्राप्त झालेले नाही. सध्या आचारसंहिता असल्याने पुढील महिन्यात नगरपालिकेत जागेची मागणी करू. यावेळी जागा न …
Read More »इच्छुकांचे अर्ज समितीकडे दाखल!
बेळगाव : गेल्या दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य रणनीती ठरवून मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार घेतला आहे. आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल उमेदवार निवडीच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. बेळगाव दक्षिण, बेळगाव …
Read More »गुलबर्ग्यात दहावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार; अधिकाऱ्यांसह १६ शिक्षक सेवेतून निलंबित
बंगळूर : सोमवारी दहावी (एसएसएलसी) परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी करण्यास परवानगी दिल्याबद्दल गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील गोब्बूर सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि १६ सहाय्यक शिक्षकांना सार्वजनिक शिक्षणाच्या अतिरिक्त आयुक्तांनी निलंबित केले आहे. निलंबनाच्या आदेशात, सार्वजनिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद प्रकाश मीणा यांनी म्हटले आहे की, ड्युटीवर असलेले परीक्षा कर्मचारी, पर्यवेक्षक …
Read More »कार्यकर्तेच मला विजयी करतील : काकासाहेब पाटील
निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली प्रकृती साथ देईल की नाही या संभ्रमावस्थेमुळे आपण उमेदवारी नाकारली होती. काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केली असून आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळाची नियोजन बैठक रविवारी
बेळगाव : शहर व उपनगरात शिवजयंती साजरी करण्याबाबत तसेच शिवजयंती चित्ररथ मिरवणूक संदर्भात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाच्या नियोजनासाठी रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित केली आहे. रविवारी सकाळी 10 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौकातील दुर्गादेवी मंदिर जत्तीमठ येथे होणार …
Read More »आबासाहेब दळवींचा अर्ज खानापूर समितीकडे दाखल
खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे आबासाहेब दळवी यांनी आज खानापूर विभाग समिती निवड समितीकडे आपला विनंती अर्ज सादर केला आहे. यावेळी शिवाजी पाटील (मणतुर्गे), अरुण देसाई (नेरसे), ईश्वर बोबाटे (मणतुर्गे), बाळासाहेब शेलार (मणतुर्गे), राजाराम देसाई (हलशीवाडी), खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, …
Read More »काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, अनेक नेत्यांना धक्का; विनय कुलकर्णी, काकासाहेब पाटील यांना लॉटरी
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. या दुसऱ्या यादीमुळे बेळगाव जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यादीत धारवाडमधून माजी मंत्री विनय कुलकर्णी, निपाणीतून माजी आमदार काकासाहेब पाटील, गोकाकमधून भाजपचे राज्यसभा सदस्य खा. इरण्णा कडाडी यांचे दूरचे नातेवाईक डॉ. महांतेश …
Read More »माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांचा समितीकडे अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून निलजी येथील रहिवासी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र चुडामणी मोदगेकर यांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. गुरुवार दिनांक 6 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta