खानापूर : खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक आज जांबोटी क्रॉस येथील निवृत्त सैनिक संघटनेच्या कार्यालयात झाली. संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षपद भूषविले. उपाध्यक्ष हनुमंत गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 2019 च्या कुस्ती आखाड्याचा जमा खर्च खजिनदार तानाजीराव कदम यांनी सादर केला. पुढील कुस्ती आखाडा घेण्याविषयी चर्चा झाली. कार्याध्यक्ष …
Read More »रोहित शर्मानंतर राहुल द्रविड, लक्ष्मण यांनाही मिळणार डच्चू
नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा टी-२० संघ निवडताना रोहित शर्माला डच्चू दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित आता भारताच्या टी-२० संघात दिसणार नाही, असे म्हटले जात आहे. पण रोहितनंतर आता प्रशिक्षक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही डच्चू मिळणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. राहुल द्रविड यांनी भारताचे प्रशिक्षकपद सांभाळल्यावर संघात …
Read More »तोरस्कर सुतार यांचा निपाणीत सत्कार
निपाणी : आटपाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत इंटर झोनल तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये येथील तेजस्विनी रमेश तोरस्कर हिने प्रथम क्रमांक मिळविला. अमृतसर (पंजाब) येथे होणाऱ्या ऑल इंडिया स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तर राष्ट्रीय नेट बॉल स्पर्धेत हरियाणा राज्य मध्ये मारिया सुतार हिने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला …
Read More »केंद्र सरकारकडून कळसा-भांडुरा प्रकल्पाला परवानगी
बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलविद्युत मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे …
Read More »कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आनंदवाडी आखाड्याची पाहणी
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने येत्या 8 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती आखाड्याच्या पूर्व तयारीसाठी आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदवाडी आखाड्यात जाऊन आखाड्याची पाहणी केली. यावेळी अध्यक्ष मारुती घाडी, उपाध्यक्ष नवरतन सिंग पनवार, पप्पू होनगेकर, संतोष होंगल, शुभम नांदवडेकर, संजय चौगुले, नरहरी माळवी, शिवाजी पवार आदी उपस्थित होते.
Read More »मराठा मंडळ पदवी महविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न
खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक विभागाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ सदस्य श्री. परशुरामअण्णा गुरव हे होते. तर तर क्रीडा शाखेसह विविध सांस्कृतिक विभागांचे उद्घाटन मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील यांनी केले. …
Read More »अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला : उद्धव ठाकरे
मुंबई : दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली. परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचं …
Read More »भारत-पाकिस्तान कसोटी मालिका मेलबर्नमध्ये रंगणार?
नवी दिल्ली : मेलबर्न क्रिकेट क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने मेलबर्नमध्ये भारत -पाकिस्तान कसोटी मालिका आयोजित करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला आहे. वास्तविक, ऑक्टोबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्याच्या यशानंतर ही कल्पना आली आहे. परंतु दोन्ही देशांमधील राजकीय मुद्द्यांमुळे बीसीसीआय आणि पीसीबी प्रस्तावित द्विपक्षीय कसोटी मालिकेसाठी सहमती दर्शवेल अशी …
Read More »कर्नाटकमध्ये शाळा, कॉलेजमध्ये मास्क बंधनकारक, कोरोना नियमांचेही करावे लागणार पालन!
बेळगाव : मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य …
Read More »एनआयएची केरळमधील पीएफआयशी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी
तिरुअनंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) शी संबंधित तब्बल 58 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. एनआयएचे वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta