तहसीलदारांना निवेदन : विविध पक्षांचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला साखर कारखान्या तर्फे प्रति टन ३ हजार ५०० रुपये आणि शासनाकडून २ हजार रुपये असे एकूण साडेपाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. अतिवृष्टी आणि महापूर काळात नुकसान झालेल्या पिकांचा निपक्षपातीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. पावसामुळे पडलेल्या घरांचा सर्वे …
Read More »विज्ञान साहित्य संमेलन युवा पिढीला प्रेरणादायी
किरण निकाडे : सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी विज्ञान संमेलन उपयुक्त ठरत आहे. या वैज्ञानिक संमेलनामध्ये युवकांचे प्रबोधन होत असून त्यांच्यासाठी हे संमेलन प्रेरणादायी प्रेरणादायी ठरत आहे,असे मत हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक किरण निकाडे यांनी व्यक्त केले. …
Read More »खानापूर तालुका सरकारी कर्मचाऱ्यांचा बेंगलोर येथे एनपीएस आंदोलनात एल्गार
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना २००६ पासून लागू झालेली नूतन पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत घातक योजना ठरली आहे. त्याच्या विरोधात बेंगलोर येथील फ्रीडम पार्क मध्ये राज्य एनपीएस संघटनेचे अध्यक्ष शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली लाखो संख्येच्या उपस्थितीत गेले तीन दिवस तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये खानापूर तालुक्यातील …
Read More »एंजल फाउंडेशनतर्फे शाळेला आवश्यक गोष्टींची भेट
खानापूर : एंजल फाउंडेशनच्या वतीने शहरातील गरजूंना मदत करण्यात येते तसेच शैक्षणिक शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेऊन शाळेला आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविण्यात येतात. अशाच प्रकारे सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा नंबर 7 येथे एंजल फाउंडेशन च्या वतीने चटईचे वितरण करण्यात आले. येथील …
Read More »परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ संपन्न
खानापूर : परीट समाजातर्फे खानापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी व हळदी कुंकू समारंभ 20 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभ राजा शिवछत्रपती स्मारक येथे घेण्यात आला. कार्यक्रमास डॉ. सोनाली सरनोबत या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. परीट (मडीवाळ) समाजाच्या महिलांच्या वतीने भाजपा नेत्या सोनाली सरनोबत यांचा सत्कार …
Read More »सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव मांडणार
बेळगाव : विधानसभेत आज शून्य प्रहरात सीमाप्रश्नावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी केवळ दिनही राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. त्यानंतर सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असल्याच्या कर्नाटकाच्या भूमिकेबाबत उद्या दोन्ही सभागृहात ठराव करण्यावर दीर्घ चर्चेनंतर सत्ताधारी-विरोधकांत सहमती झाली.बेळगावातील …
Read More »खानापूरात सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून भाडे हडप करण्याचा प्रकार
आनंद वाझ यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या सर्वे नंबर ५३ /अ या सरकारी जागेवर बेकायदेशीर गाळे उभारून लाखो रूपये हडप करण्याचे प्रकार सुरू असुन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्याने नगर पंचायतीचा लाखोंचा महसुल बुडीत चालला आहे. तेव्हा या जागेवरील अतिक्रमण हटवून सदर जागा …
Read More »विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद
बेळगाव : बैतूनी इटारसी मध्य प्रदेश येथील भारत भारतीय आवास विद्यालय शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33व्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील मुलींच्या पहिल्या सामन्यात संत मीरा शाळेने मध्यक्षेत्राचा 5-3 असा पराभव केला विजयी संघाच्या समीक्षा …
Read More »मराठा मंडळाच्या सहाना आणि भूमिका यांना ज्यूडोमध्ये युनिव्हर्सिटी ब्लू
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात शिकणाऱ्या बी.कॉम. प्रथम वर्षाची सहाना एस. सार. आणि बी.ए. प्रथम वर्षाची भूमिका व्ही.एन. विद्यार्थिना ज्यूडोमध्ये विशिष्ट कामगिरी केल्याबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाचा ‘युनिव्हर्सिटी ब्लू’ हा मानाचा किताब बहाल करण्यात आला आहे. सहाना एस. सार. हिने शिमोगा येथे आयोजित …
Read More »सकल मराठा समाजाचे भव्य आंदोलन
बेळगाव : राज्यभरातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी २ ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आज अधिवेशनादरम्यान बेळगावमधील कोंडसकोप्प येथे भव्य आंदोलन छेडण्यात आले. अनेक वर्षांपासून ह्या आरक्षणाची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी बंगळूरच्या गवीपूर मठाचे मंजुनाथ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाला हजारोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta