Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध समस्यांबाबत शहर देवस्थान कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

  बेळगाव : बेळगाव येथे दसरा सण भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा सण मोठ्या प्रमाणात परंतु शांततेने साजरा करण्यासंदर्भात आज गुरुवारी आमदार अ‍ॅड. बेनके यांच्या नेतृत्वाखाली शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासमवेत बैठक पार पडली. …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतून अशोक गेहलोत यांची माघार

  जयपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावरुन काँग्रेस आमदारांनी केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाबाबत सोनिया गांधींची माफी मागितल्याचे गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले …

Read More »

रिअल इस्टेट एजंट सुधीर कांबळे खूनप्रकरणी पत्नी, मुलगीसह एकाला अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात 16 सप्टेंबर रोजी रात्री रियल इस्टेट एजंट सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प) यांचा घरात घुसून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. शनिवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी मयत सुधीरच्या भावाने दिलेल्या …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी बैठकीत शहरातील स्वच्छतागृहांबाबत चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी दररोज २० रूपये एका स्वच्छतागृहाला खर्च करून शहरातील स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या २० वार्डातून कुपनलिकाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाणी सोडण्यावर नियंत्रण नसल्याने याचा दुरूपयोग होत आहे, असे मत नगरसेवक नारायण मयेकर यानी मांडले. काही कुपनलिकाना नागरिक …

Read More »

यल्लमा देवस्थान परिसरातील समस्यांबाबत किरण जाधव यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव (प्रतिनिधी) : सौंदत्ती यल्लमा देवस्थान परिसर विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. येथील समस्या भाविकांना भेडसावणाऱ्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधांची पूर्तता करून भाविकांची सौंदत्ती यल्लमा यात्रा सुकर होईल याची काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव, सकल मराठा समाजाचे …

Read More »

घरफोडीत सहभागी असल्याच्या संशयावरून रामनगरातून तिघे ताब्यात

  खानापूर, : गेल्या कांही महिन्यापासून पोलिसांना चकवा देत दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या तिघांना नंदगड पोलिसांनी रामनगरमधून (ता. जोयडा) स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री रामनगर औद्योगिक वसाहतीत कारवाही केली. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. काही दिवसांपासून हावेरीतील हे तिघे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद …

Read More »

राष्ट्रपती मुर्मू यांचा विधानसौधमध्ये नागरी सत्कार

  पद्मश्री पुरस्कार विजेते जोगती मंजम्मा, पदुकोणसह मान्यवरांची उपस्थिती बंगळूर : राज्याचे शक्ती केंद्र विधानसौध येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा मंगळवारी सायंकाळी नागरी सत्कार करण्यात आला. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची निवड करण्यात आली होती. इस्कॉनचे मधू पंडित दास (समाजसेवा), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबार (साहित्य), बॅडमिंटनपटू …

Read More »

लम्पीस्किनमुळे शहापूरमधील शेतकऱ्याच्या गाईचा अंत

  बेळगाव : सराफ गल्ली शहापूरमधील अल्पभूधारक शेतकरी नारायण(बाळू) बुध्दाप्पा लाड यांच्या गाईला लम्पीस्किन लागण होऊन अंगभर गाठी, ताप येऊन अशक्त झाल्याने खासगी डॉक्टरकडून उपाय करुन घेतले. कारण सरकारी डॉक्टर चांगला उपाय करत नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मनात भवना झाल्याने ते खासगी डॉक्टरनां बोलावून उपाय करुन घेत होते.पण त्याचा कांहीच उपयोग …

Read More »

पीएफआयवर बंदी घालून देशविरोधी अत्याचार करणाऱ्यांना संदेश

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची प्रतिक्रीया, बंदीचे स्वागत बंगळूर : पीएफआय संघटना देशात तोडफोडीची कृत्ये करत आहे. त्याच्या विविध परिवर्तनाचा परिणाम म्हणून, पीएफआय आणि त्यांच्या संलग्न संस्था हे बंदी घातलेल्या सीमी संघटनेचे अवतार आहेत. देशातील अनेक विध्वंसक कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्राच्या निर्णयाचे …

Read More »

दुबईत जारकीहोळींचे सहर्ष स्वागत..

संकेश्वर (महंमद मोमीन) : यमकनमर्डीचे आमदार कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, युवानेते राहुल जारकीहोळी हे दुबई प्रवास दौऱ्यावर आहेत. दुबई येथे जारकीहोळी पिता-पुत्राचे चाहत्यांकडून सहर्ष स्वागत करण्यात आले. सतीश जारकीहोळी यांनी दुबई येथील गुलाब कुतबुद्दीन कुमनाळी यांच्या मुतेल्हा शारजाह युनायटेड आमिराती येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. गुलाब कुमनाळी …

Read More »