खानापूर : खानापूर फोटोग्राफर असोसिएशच्या वतीने 6 डिसेंबर रोजी शुभम गार्डन येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष दीपक गुरव, भाजपा नेत्या सोनाली सरनोबत, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, खानापूर भाजपा अध्यक्ष संजय कुबल, समाजसेवक रवी कोटगी, ज्ञानेश्वर ओलकर, अमित पवार …
Read More »‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!
मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. अशातच काल बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून …
Read More »महाराष्ट्र -कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला. कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत …
Read More »“शिंदे-फडणवीस सरकार नामर्दच..”; संजय राऊत
मुंबई : ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमांचं संरक्षण करता येत नाही. त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत आणि मुख्यमंत्री आहेत कुठे यासर्व वादामध्ये, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, हो हे सरकार नामर्दच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचारही घेतला आहे. यासोबतच …
Read More »महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील बस सेवा ठप्प
बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांमधील बस वाहतूक आज ठप्प झाली आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव भेटीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील सीमावाद चव्हाट्यावर आला असून सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असून खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांमधील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिक्कोडी आगार नियंत्रक शशिधर यांनी माहिती …
Read More »दहावी परीक्षा ३१ मार्चपासून
बंगळूर : दहावीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत होणार आहे. परिक्षेचे अंतिम वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी याबाबत ट्विट केले आहे. अधिकृतपणे त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. नेहमीप्रमाणे पहिला पेपर प्रथम भाषेचा आहे. त्या दिवशी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, तर …
Read More »न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लावला कांदा!
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मिनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्प राबवले जातात. त्या पद्धतीने मुख्याध्यापक जे. एस. वाडकर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग प्रमुख श्री. एस. व्ही. यादव व सहाय्यक शिक्षिका सविता कुरले यांनी क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन कांदा लावणीचा अनुभव घेतला. यावेळी सौंदलगा येथील प्रगतशील शेतकरी …
Read More »आर. एम. चौगुले यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारलेल्या बालचमुंचा गौरव
बेळगाव : सांबरा गावात दिवाळीनिमित्त किल्ल्याच्या प्रतिकृती साकारण्यात आलेल्या बालचमुंचा गौरव करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी रात्री आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमा चिंगळी होते. अभियंते आणि म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्यावतीने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारलेल्या सर्व बालचमुंना प्रमाणपत्र आणि मंडळाना चषक देवून गौरवण्यात आले. …
Read More »येत्या 48 तासात कन्नड संघटनांची गुंडगिरी थांबविली नाही तर स्वतः बेळगावात हजर : शरद पवार
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर असताना दोन्ही राज्यात राजकारण तापले आहे. महाराष्ट्र सरकारची बाजू भक्कम असल्यामुळे कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने रडीचा डाव मांडला आहे. महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री बेळगांव दौऱ्यावर येणार होते त्यांना कर्नाटक सरकारने हेतुपुरस्सर प्रवेशबंदी केली तर विविध कन्नड संघटनांनी …
Read More »अटक केलेल्या म. ए. समिती नेत्यांची सुटका
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी बेळगाव येथे येणाऱ्या महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्र्यांची अडवणूक करू नका या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी गेलेल्या म. ए. समितीच्या अटक केलेल्या नेत्यांची बेळगाव पोलिसांनी सुटका केली. सीमा भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सीमा समन्वयक मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta