राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन निर्मिती सुविधेचे उद्घाटन बंगळूर : प्रगत तंत्रज्ञानाखाली क्रायोजेनिक इंजिनचे उत्पादन हा देशाच्या विज्ञान क्षेत्रातील एक मोठा मैलाचा दगड आहे. अंतराळ उपग्रह वाहकांसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. एचएएल हा १९९३ पासून इस्रोच्या अंतराळ संशोधनाचा कणा आहे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी येथे …
Read More »सत्तासंघर्षावर सुनावणी: सर्वोच्च न्यायालयाचा शिंदेंना दिलासा, ठाकरेंना धक्का
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती नाही नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या कोर्टातच लढली जाणार आहे. दुसरीकडे आमदारांची अपात्रता, पक्षांतर …
Read More »सिद्धरामय्याच पेसीएम मुख्यमंत्री : प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील
अंकली (प्रतिनिधी) : राज्यात कोणी पेमेंट मुख्यमंत्री असेल तर ते सिद्धरामय्याच होते, राज्यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या वाढीला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केला. नलिनकुमार कटील यांनी मंगळवारी विजापुरातील सिद्धेश्वर आश्रमाला भेट दिली. या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, सिद्धरामय्या …
Read More »पारिश्वाडच्या बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड (ता. खानापूर) येथील बसवेश्वर विविध उद्देशीय सौहार्द सहकारी सोसायटीची १२वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुभाष गुळशेट्टी होते. सदाशिव देवरमनी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सभेची सुरूवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले. …
Read More »पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्स विद्यापीठाची डाॅक्टरेट
संकेश्वर : किराणा घराण्याचा गायकीचा वारसा समथ॔पणे पुढे नेणारे पंडित कैवल्यकुमार गुरव यांना फ्रान्समधील सोरेबाॅन विद्यापीठाने डाॅक्टरेट पदवीने सन्मानित केले. सोरेबाॅन विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जागतिक दर्जाच्या ञ असणारे हे विद्यापीठ आहे. पंडित कैवल्यकुमार गुरव यांनी शास्त्रीय गायनातील ‘रियाज’ यावर केलेल्या विशेष संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू थाॅमस प्रेड यांच्या …
Read More »श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गा दौडमुळे बिजगर्णीत भक्तीमय वातावरण
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान बिजगर्णी यांच्या वतीने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत गावातून पहाटे दुर्गा दौड फेरी काढुन जनजागृती करण्यात येत आहे. या दुर्गा दौड फेरीतील ध्वजाचे घरोघर पुजन करुन स्वागत केले जात आहे. गेल्या काही वर्षापासून प. पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून श्री शिवप्रतिष्ठान बेळगाव यांच्या वतीने घटस्थापनेपासुन ते विजयादशमीपर्यंत …
Read More »जिल्हास्तरीय प. पू. महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत बेळगाव जिल्हा अम्याचुअर सिलंबम्ब असोसिएशनच्या सिलंबम्बपटूंचे घवघवीत यश
बेळगाव (प्रतिनिधी) : उपसंचालक, पदवी पूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि गोमटेश संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, हिंदवाडी-बेळगाव यांच्या संयुक्त सहयोगाने बेळगाव जिल्हास्तरीय पदवी पूर्व महाविद्यालयीन 2022-23 क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठात या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी घेण्यात आलेल्या सिलंबम्ब स्पर्धेत 35 ते 60 किलो वजनी गटात …
Read More »शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
बेळगाव : हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडस गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात अज्ञात मुलाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. 20 सप्टेंबरपासून बेपत्ता झालेल्या मुलाच्या शोधार्थ गावातील अनेकांची चौकशी केल्यानंतर …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने विविध विकासकामांचे उद्घाटन
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने ग्राम पंचायतीच्या 15 व्या आयोगातून निधी मंजूर करून येळ्ळूर येथील विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील पाटील स्मशानभूमी, बाराभाव (विहीर), एससी स्मशानभूमी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन व उद्यान विकासकामांचे ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ …
Read More »देशात दुसर्यांदा टाकलेल्या छाप्यात पीएफआयचे 247 जण ताब्यात
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज दुसर्यांदा पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत 247 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात 44, कर्नाटकात 72, आसाममध्ये 20, दिल्लीत 32, महाराष्ट्रात 43, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta