Monday , April 20 2026
Breaking News

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश झुगारणाऱ्या पतीची कारागृहात रवानगी

Spread the love

 

बेळगाव : कौटुंबिक न्यायालयाचा आदेश न जुमानता पत्नी व मुलाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देण्यासाठी नाकारणाऱ्या पतीला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावल्याची घटना शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी घडली आहे.
अमर विष्णू आमरोळे (वय 35, रा. बसवाण गल्ली, खासबाग बेळगाव) असे शिक्षा ठोठाविलेल्या पतीचे नाव असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. अमर आमरोळे व त्यांची पत्नी सौ. मनाली आमरोळे यांच्या घटस्फोटाचा खटला हायकोर्टात प्रलंबित असून अमर आमरोळे याला पत्नी व मुलाच्या उदरनिर्वाहासाठी महिना 8 हजार रु. रक्कम देण्याचा न्यायालयाने आदेश दिला त्यापैकी पत्नीला महिना 6 हजार रुपये व मुलाला 2 हजार रुपये देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे मात्र आमरोळे यांनी अद्याप एकदाही ही रक्कम पत्नी मनाली व मुलगा मिथिलेश याला देऊ केली नाही.
न्यायालयाच्या आदेशानंतर देखील पती अमर आपल्याला व मुलाला उदरनिर्वाहाची रक्कम देत नसल्याची तक्रार पत्नी मनाली यांनी केली होती त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाचा आदेश धुडकाविल्याबद्दल पती अमर विष्णू आमरोळे याला कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मनाली आमरोळे यांच्या वतीने ऍड. मनीष जाधव यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *