काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : बेळगाव दक्षिणमतदार संघासाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजीसत्र सुरु झाले असून इच्छुक उमेदवारांविरोधात काँग्रेसमधील विविध नेत्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरु केली आहे. २०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार रमेश कुडची, सरला सातपुते यांच्या नावाची चर्चा सुरु असून काँग्रेसमधील हे …
Read More »नितीन गडकरी-बोम्मईंची रस्ते, वाहतूक समस्येवर चर्चा
बंगळूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भू-महामार्ग विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय मंथन राष्ट्रीय चौकशी संकुलाच्या उद्घाटनासाठी बंगळुर येथे आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली. बंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज (ता. ८) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बंगळुरमधील रस्ते …
Read More »नीट परीक्षेत पहिल्या १० मध्ये कर्नाटकचे तीन विद्यार्थी
हृषिकेश गांगुले राज्यात पहिला, रुचा पावशे दुसरी बंगळूर : “नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने बुधवारी रात्री उशिरा नीट-२०२२ चा निकाल जाहीर केला. कर्नाटकातील तीन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. हृषिकेश नागभूषण गांगुले कर्नाटकचा टॉपर आणि अखील भारतीय गुणवत्ता यादीत तिसरा टॉपर आहे. जुलैमध्ये बीएनवायएस (बॅचलर …
Read More »सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्याचे निवेदन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील सार्वजनिक श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पालिकेने नेटकी व्यवस्था करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी राजशेखर चौगला यांना देण्यात आले आहे. निवेदनात हिरण्यकेशी नदीकाठावर सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे व्यवस्थितपणे विसर्जन करता यावे याकरिता थरपाची सोय करावी. श्री मूर्तींचे पाण्यांत विसर्जन करण्यासाठी प्लास्टिक बॅरेलने तयार केलेले थरप उपयोगी ठरणार आहे. …
Read More »अंमणगीत दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांना आदरांजली..
संकेश्वर (महंमद मोमीन) : अंमणगी संगोळ्ळी रायन्ना सर्कल येथे हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन, आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना कर्नाटक मेंढपाळ आणि लोकर उत्पादक सहकारी संघ वक्कूट बेळगांव आणि उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष शंकर हालप्पा …
Read More »बिनधास्त आमदार : अरुण सिंग
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती हे बिनधास्त नेते होते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मंत्री उमेश कत्तीं निवासस्थानी भेट देऊन दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन श्रद्धांजली …
Read More »यंदा प्रतिटन ५ हजार रुपये मिळालेच पाहिजेत
माजी खासदार राजू शेट्टी : गळतगा येथील कार्यक्रमात मागणी निपाणी (वार्ता) : वर्षानुवर्षे केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. बारा महिने ऊस पिकवूनही त्यांना योग्य भाव दिला जात नाही. याशिवाय इतर पिकांचे भावही ठरलेले नाहीत. त्यामुळे सर्व पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी बांधवांनी …
Read More »कपिलेश्वर तलाव पुन्हा एकदा स्वच्छ : आमदार अनिल बेनके
बेळगाव : गेल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसाचे रस्त्यावरील सांडपाणी पवित्र कपिलेश्वर तलावामध्ये मिसळण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अनेकांच्या प्रयत्नाने या तलावाची स्वच्छता झाली आहे. भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे विनंती केली होती, त्याचबरोबर मध्यवर्ती गणेश महामंडळाने, स्थानिक नगरसेवक वैशाली भातकांडे व कपिलेश्वर मंदिर ट्रष्ट कमिटीदेखील …
Read More »नीट परीक्षेत उचगावच्या कन्येचे अभिनंदनीय यश
ऋचा पावशे हिचा राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक उचगाव : राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात (NEET) परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक प्राप्त करून उजगावची कन्या ऋचा पावशे हिने बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. ऋचा ही डॉ. श्री. मोहन व डॉ. सौ. स्मिता पावशे यांची …
Read More »विरोधकांनी एकत्र यावे, नेता नंतर निवडता येईल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट
नवी दिल्ली : भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी आधी एकत्र येण्याची गरज आहे. या आघाडीचा नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ठरवता येईल, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नितीशकुमार प्रथमच दिल्ली दौर्यावर आले असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या दृष्टीने ते बिगर भाजप नेत्यांच्या गाठीभेटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta