Friday , June 5 2026
Breaking News

शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव

Spread the love

 

बेळगाव : शहापूर येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मानकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती प्रारंभ होते आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यावर दरवर्षी रथोत्सव करण्यात येतो. अखंड ३७० वर्षे ही रथोत्सवाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. १६५२ पासून श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव दरवर्षी केला जातो.
सकाळी श्री विठ्ठल मंदिराच्या पासून रथोत्सवाला मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा घालून स्वागत करण्यात येत होते. रथात विराजमान झालेल्या विठुरायाची आरती करून श्री फळ देखील वाढवण्यात येत होते. रथ ओढण्यासाठी महिला देखील भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या.
विठ्ठल देव गल्ली, आचार्य गल्ली, गडेमार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, मिरापुर गल्ली आणि होसुर मार्गे रथ मंदिराकडे आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदार देऊळकर, वेदमूर्ती नागेश शास्त्री हर्लेकर, अक्षय जोशी, विकास कुलकर्णी, संतोष चिकोर्डे, गणपतराव चिकोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *