Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

रस्ता बंद होत असल्याने उद्योजकावर संकट

कामगारावरही होणार परिणाम : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : कर्नाटकातील (निपाणी) अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रातील अर्जुनी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील अर्जुननगर (ता. कागल) येथे ३५ वर्षापूर्वी जागा घेऊन विविध प्रकारचे कारखाने सुरू केले. तेव्हापासून कारखान्यातील कामगार व वाहनासाठी कर्नाटक हद्दीतील रस्ता रहदारीचा बनला होता. पण अचानकपणे या रस्त्यावर कुंपण घालण्यात येत …

Read More »

हिजाब बंदीच्या आदेशावर कर्नाटकला ‘सर्वोच्च’ नोटीस

पुढील सुनावणी पाच सप्टेंबर रोजी बंगळूर : पदवीपूर्व महाविद्यालयामधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. २९) कर्नाटक सरकारला नोटीस बजावली. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने यांचिंकावर नोटीस बजावली आणि त्यावर पुढील सुनावणी पाच सप्टेंबरला ठेवली. मात्र फातिमा बुशरा यांच्या नेतृत्वाखालील याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाला …

Read More »

हंचिनाळ येथे विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

  हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे विजेचा धक्का लागून घराबाहेर सोडलेल्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील कोगनोळी रोडवर कदम आंब्याजवळ श्री. मधुकर दत्ता पाटील (रामजी) यांचे राहते घर असून ते शेतीसह पशुपालन व्यवसाय करतात. आज सकाळी आठच्या सुमारास म्हैस घराबाहेर सोडलेली …

Read More »

गणेशमूर्ती मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुचाकीवरून पाहणी!

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बेळगावात चक्क दुचाकीवरून फिरून गणेशमूर्ती मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावाची पाहणी केली. गणेशोत्सवानिमित्त मिरवणूक निघणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सोमवारी चक्क दुचाकीवरून प्रवास केला. गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी …

Read More »

खानापूरात गणेशोत्सव निमित्ताने पोलिस पथसंचलन

खानापूर (प्रतिनिधी) : येत्या बुधवारी दि. ३१ रोजी होणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधुन शहरासह तालुक्यातील गावोगावी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर सोमवारी दि. २९ रोजी खानापूर शहरात पोलिस खात्याच्या वतीने पथसंचलन काढून जनतेला शांततेत व उत्साहात गणेशोत्सव ११ दिवस साजरा करण्याचे आवाहन …

Read More »

विवेकानंद सौहार्दची वार्षिक सभा खेळीमेळीत

बेळगाव : कॉलेज रोडवरील प्रथितयश संस्था विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑपरेटिव्ह सोसायटीची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. बुधवार दि. 24 रोजी लोकमान्य रंगमंदिरमध्ये ही सभा झाली. सोसायटीचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी सोसायटीच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, की संस्थेला या आर्थिक वर्षात 7 लाख 50 सजार रुपयांचा नफा झाला. …

Read More »

मराठी कागदपत्रांसाठी बेळवट्टी ग्राम पंचायतीला निवेदन

  बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये कन्नड बरोबर मराठी कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार बेळवट्टी येथेही निवेदन देण्यात आले. युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, बेळवट्टी …

Read More »

घुबडाला जीवदान!

  बेळगाव : रात्रभर पतंगाच्या मांजात पंख अडकून पडलेल्या घुबडाची सुखरूप सुटका नागरिकांनी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलने करून घुबडाला जीवदान दिले. शहापूर आचार्य गल्ली येथे एका घराच्या छप्परावर मांजात पंख अडकून जखमी झालेले घुबड पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पाहिले. नंतर आचार्य गल्लीतील गोपी गलगली, नरेंद्र बाचीकर आणि विलास अध्यापक यांनी छप्परावर …

Read More »

खानापूर आम आदमीकडून अग्निपथाला विरोध

  अध्यक्ष भैरू पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरतीला खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांनी खानापूर येथील शिवस्मारकातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, अग्निपथ सैन्य भरतीत बरेच तोटे …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आज बैठक

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आज सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 6-00 वाजता सिद्ध भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर पाटील गल्ली (शनी मंदिर समोर) बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस महादेव पाटील, कार्याध्यक्ष रणजित चव्हाण – …

Read More »