Tuesday , April 21 2026
Breaking News

हल्याळ तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आक्रोश

Spread the love
आजपासून उपोषण सुरू :५५०० दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
निपाणी (वार्ता) :  यंदाच्या हंगामातील उसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हल्याळ येथील प्यारी साखर कारखान्याने हा दर द्यावा, या मागणीसाठी हल्ल्याळमधील छत्रपती शिवाजी चौकात रयत संघटनेने रास्ता रोको करून धरणे आंदोलन छेडले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यास शुक्रवारपासून (ता. २८) पासून परमात्माजी महाराज यांच्यासह हल्याळ तालुक्यातील रयत संघटनेचे कार्यकर्ते उपोषण सुरू करण्यात असल्याचा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. हल्याळ येथे तहसीलदार कार्यालयासमोर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परमात्माजी महाराज होते.
राजू पोवार म्हणाले, साखर मंत्र्यांच्या बैठकीत हल्ल्याळ येथील प्यारी साखर कारखान्याबाबत विशेष चर्चा घडवून आणली होती. त्यासह इतर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन ५५०० रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन साखरमंत्र्यांनी दिले होते. पण आजपर्यंत तोडगा न निघाल्याने बेळगाव जिल्ह्यात निरंतरपणे रयत संघटनेतर्फे आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी संघटित राहून रस्त्यावर उतरले तरच ऊसाला चांगला दर मिळणार आहे. एफ आर पी च्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांना लुटण्याचे तंत्र अवलंबले आहे. अतिवृष्टी महापूर काळात पिकांचे नुकसान होऊनही निपक्षपातीपणे सर्वे न झाल्याने शेतकरी भरपाई पासून दूरच राहिला आहे. त्याशिवाय परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. त्यामुळे तात्काळ ऊस दराचा तोडगा काढण्यासह पिकांची भरपाई न दिल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय शेतकरी राहणार नसल्याचे राजू पोवार यांनी सांगितले. यावेळी परमात्मा महाराज व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून लढा सुरूच ठेवला असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, राघवेंद्र नाईक, कुमार बोभाटे, नागेंद्र जीओजी, मंजुनाथ गौडा, बाबू घाडी, संतोष लोंढे, शंकर काजगार, एम व्ही गाडी, मारुती पवार, शिवानंद मोगलीहाळ, प्रकाश नाईक, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, बाळासाहेब पाटील यांच्यासह कारवार तालुक्यातील रयत संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *