Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

सर्प दंशाने आठ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

  कोगनोळी : येथे सर्पाने दंश केल्याने आठ वर्षीय शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 22 रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. पार्श्व शांतिनाथ गोटूरे वय आठ असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिकत असणारा …

Read More »

दिवाळीनिमित्त पोलिस अलर्ट

रात्र गस्तीसह बाजारपेठेत पोलिसांचा वॉच : रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष निपाणी (वार्ता) : दिवाळी सणानिमित्त अनेक जण परगावी गेले आहेत. शिवाय बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे निपाणीतील पोलिस प्रशासनही दिवाळीनिमित्त अलर्ट मोडवर आले असून रात्रगस्तीत वाढ केली आहे. पोलिस प्रशासन रेकॉर्डवरील आरोपींसह बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहेत. दिवाळीनिमित्त अनेक कुटुंबे …

Read More »

सौंदत्तीचे आमदार, कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी यांचे निधन

  बेंगळुरू : सौंदत्तीचे आमदार, कर्नाटक विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी (वय 56) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर बेंगळुरु मनीपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आनंद (विश्वनाथ) चंद्रशेखर मामनी यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ रोजी बेळगाव जिल्ह्यातील सौदती …

Read More »

कानशिनकोपात विद्युत तारेच्या स्पर्शाने बालकाचा मृत्यू

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कानशिनकोपात घरासमोर पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानशिनकोप येथील वरूण बसाप्पा कोलकार वय ६ वर्षे या बालकाचा घराच्या समोर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरिय तपासणीस पाठवून सबंधित खात्याचे …

Read More »

शिवसेना किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

  बेळगाव : दीपावलीनिमित्त शिवसेना (सीमाभाग बेळगाव) यांच्यातर्फे गतवर्षी आयोजित शिवकालीन भव्य किल्ला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. शहरातील मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिर येथे शिवसेनेच्या 2021 सालच्या किल्ला स्पर्धेचा हा बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार …

Read More »

हंचिनाळ ब्रह्मनाथ मल्टीपर्पजकडून रू. 10 लाख 75 हजार 318 हून अधिक बोनस वाटप

  हंचिनाळ : येथील सहकार क्षेत्रात सर्वात अग्रगण्य असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. हंचिनाळ. या संस्थेमार्फत सन 2021 22 सालाकरिता शेकडा नऊ रुपये याप्रमाणे आर्थिक वर्षात 261238 लिटर दूध संकलन करून विक्रमी दहा लाख 75 हजार 318 रुपये 20 पैसे इतका बोनस संस्थेमार्फत वाटप करून गावाच्या इतिहासात विक्रम …

Read More »

सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा जिवंत ठेवा : ज्येष्ठ सीमा सत्याग्रही शंकर पाटील

  खानापूर : मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी तसेच मागील 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमावासीयांनी दिलेला लढा व्यर्थ जाऊ नये. यासाठी तालुक्यातील मराठी जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र या व राष्ट्रीय पक्षाच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सीमालढा हा अनेकांच्या त्यागावर आणि बलिदानावर उभा आहे. सीमालढ्यासाठी अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. याची …

Read More »

‘त्या’ शाळकरी मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या!

  शिवाजीनगर येथील रहिवाशांचा पोलीस आयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा बेळगाव : बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवाशांनी 16 वर्षीय शाळकरी मुलाच्या हत्येचा निषेध करत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शहरात जोरदार निदर्शने केली. दि. 20 ऑक्टोबर रोजी बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावानजीक शिवारात छ. शिवाजीनगर 5 व्या गल्लीतील प्रज्वल …

Read More »

आर्मी स्कूल स्केटर्स अवनीश आणि खुशी यांची राज्यस्तरिय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : आर्मी प्रायमरी स्कूल, जिजामाता स्कूल कॅम्प बेळगावचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटरस यांची 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी अवनीश कोरीशेट्टी, खुशी आगासिमनी यांची निवड झाली आहे. हे दोघे ही राज्य चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत हे स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक …

Read More »

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्त्याच्या कामाला चालना

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ते बेळगुंदी गावापर्यंत पक्क्या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर व संबंधित गावचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आज रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यामुळे बेनकनहळी, …

Read More »