Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

शिवेंद्र पाटील यांची देश पातळीवरील शूटिंग स्पर्धेसाठी निवड

कोगनोळी : येथील उद्योजक महेश पाटील यांचा मुलगा शिवेंद्र पाटील याची देश पातळीवरील शुटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र मुंबई येथे शूटिंग स्पर्धेत 340 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात तिसरा तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवेंद्रच्या यशामुळे कोगनोळी गावचा …

Read More »

सौंदलगा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा

  सौंदलगा : शतकोत्तर परंपरा असणारी कुंभार गल्लीतील दत्त मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सौंदलगा येथील कुंभार गल्लीतील दत्त मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी १०० वर्षांपूर्वी पासून साजरी केली जाते. याची शंभर वर्षांपूर्वी सुरुवात दत्त मंदिराचे पुजारी कै. रामचंद्र कुंभार, कै. दामाजी कुंभार या दोन भावांनी साजरी …

Read More »

सौंदलगा येथे रस्ता कामाचा शुभारंभ

  सौंदलगा : सौंदलगा येथील वार्ड नंबर दोन मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून सीसी गटार व सीसी रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संग्रामसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामपंचाय सदस्य विक्रम पाटील म्हणाले की, …

Read More »

शिंदोळी ग्रामपंचायतच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  खानापूर : खानापूर तालुक्यामध्ये शिंदोळी ग्रामपंचायतच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सुभेदार नारायण झुंजवाडकर यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर माणिकवाडी गावात विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अध्यक्ष राजेश पाटील यांनी माजी सैनिक नारायण झुंजवाडकर यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाला …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतकडून चांगळेश्वरी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता झाली दूर…

बेळगाव : येळ्ळूर येथील ग्राम देवता श्री चांगळेश्वरी मंदिर परिसरात गेली कित्येक वर्षाची मागणी आज ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केली पूर्ण येळ्ळूर येथील चांगळेश्वरी मंदिर समोर पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीनचे आज उद्घाटन झाले. चांगळेश्वरी मंदीरला बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना यात्रा काळात व इतर दिवशी पिण्याच्या पाण्याची कमतरता …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची कार्यकारिणी जाहीर

बेळगाव : कोरोनाचा कहर कमी झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची 2022- 23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे असेल. अध्यक्ष- रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष-रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष-रमेश पावले, सतीश गोरगोंडा, रमेश कळसन्नवर, शिवराज पाटील, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, स्वागताध्यक्ष-मदन बामणे, …

Read More »

लाच घेतल्याशिवाय कोणतीही फाईल हालत नाही

उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे, अभियंत्याच्या जामीन प्रकरणी व्यक्त केले मत बंगळूर : सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. लाच घेतल्याशिवाय कोणतीही फाईल हलत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने बंगळुर विकास प्राधिकरणाच्या (बीडीए) सहाय्यक अभियंत्याला जामीन नाकारताना सांगून सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. न्यायमूर्ती के. नटराजन यांनी नुकत्याच दिलेल्या आदेशात के. टी. …

Read More »

नितीन गडकरींच्याच विरोधात ‘सीबीआय’चा वापर होऊ शकतो : कन्हैय्या कुमार

  नागपूर :  “सध्या भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो.”, अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज (शनिवार) नागपुरात व्यक्त केली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार …

Read More »

संकेश्वरात चोरीचा प्रयत्न फसला..

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोरक्षण माळ येथील सतीश दुंडप्पा शिंत्रे यांच्या घरावर शुक्रवार दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १.१० वाजता घराची कौले काढून चोरांनी घरात प्रवेश मिळविला. घरातील लोक जागे झाल्याने चोरांनी आल्या वाटेने पळ काढल्याची घटना घडली आहे. याविषयी सतीश शिंत्रे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, काल …

Read More »

भारताचा झिम्बाब्वेवर 5 गड्यांनी विजय

  हरारे : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना ‘हरारे स्पोर्ट्स क्लब’ क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात भारताने यजमान संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करून यजमान संघाने …

Read More »