बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा निर्मूलन डेपोचा कॉलम भरणी पूजन कार्यक्रम दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाला. या कचरा निर्मूलन डेपो उपक्रमासाठी नरेगाच्या माध्यमातून वीस लाख रुपये निधी मिळालेला आहे. कचरा निर्मूलन ही जबाबदारी ग्रा. पंचायती बरोबर नागरिकांचीही आहे. त्यासाठी व्यवस्थित स्वरुपात प्रयत्न होणे अपेक्षित होते …
Read More »बिबट्याच्या शोधार्थ विशेष मोहिम
बेळगाव : मागील पंधरा दिवसापासून गोल्फ कोर्सच्या मैदान परिसरात वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याला अद्याप यश आलेले नाही. बिबट्याची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळेच आज गोल्फ कोर्स परिसरात पोलीस अधिकारी आणि वनाधिकारी यांच्या टीमने बिबट्याच्या शोधार्थ विशेष मोहिमे हाती घेतली आहे. त्यामुळे गोल्फ कोर्स परिसराला …
Read More »गणेश चौक टिळकवाडी येथील गणेश मंडळाची मुहूर्तमेढ उत्साहात
बेळगाव : गणेश चौक टिळकवाडी येथील गणेश मंडळाची मुहूर्तमेढ आज 19/8/22 रोजी नगरसेवक श्री. आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते रोवण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी वेंकटेश सरनोबत, अरूण पतार, उदय मुडलगीरी, नारायणराव पै, दौलत शिंदे, दयानंद हिशोबकर, वसंत हेब्बाळकर, संकेत कुलकर्णी, चेतन भाटी, वेंकी कामत, अंकुश कामत, संकेत कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी …
Read More »नियमीत बससेवेसाठी मच्छे ग्रामस्थ-विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
बेळगाव : नियमीत बस सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील मच्छे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज रास्ता रोको करून आंदोलन केले. मच्छे गावातून दररोज शेकडो विद्यार्थी बेळगावला विविध शाळा आणि महाविद्यालयांसाठी येतात. विद्यार्थ्यांना येण्यासाठी योग्य बस व्यवस्था नाही. बसेसची संख्या कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी बसच्या दारात उभे राहून …
Read More »कोल्हापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात अग्निपथ योजनेतंर्गत भरती मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये अग्निपथ योजनेतंर्गत शिवाजी विद्यापीठ परिसरात क्रीडा मैदानावर 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत भरती मेळावा होणार आहे. कोल्हापुरातील भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाली आहे. नोंदणीसाठी 03 सप्टेंबर 2022 पर्यंतची अंतिम मुदत आहे. या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा), अग्निवीर …
Read More »दिल्लीतील कर्नाटक भवनात एका कर्मचार्याची आत्महत्या
नवी दिल्ली : दिल्लीतील कर्नाटक भवनातील एका कर्मचार्याने आत्महत्या केली आहे. अमित असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमितने माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या सरकारी निवासस्थानातील कामगार क्वार्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथील रहिवासी असलेला अमित दिल्लीतील कर्नाटक भवन येथे …
Read More »राष्ट्रस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या गोशीनारू कराटे संस्थेच्या कराटेपटूंनी दाखविली विशेष चमक
बेळगाव : बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत बेळगावच्या गोशीनारू कराटे संस्थेच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले. बेंगळूर येथील गुंडूराव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, चेन्नई, मध्यप्रदेश, गोवा यास अन्य राज्यातील सुमारे 300 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता. नऊ वर्षाखालील वयोगटात गौरीश …
Read More »मराठीत परिपत्रेक द्या : तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीकडे मागणी
बेळगाव : सर्व सरकारी परिपत्रके, कागदपत्रे मराठी भाषेमध्ये देण्याची मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने रोजी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात युवा आघाडीतर्फे ग्रा. पं. ला निवेदन देण्यात आले. म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलीक, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष …
Read More »सौंदलगा येथे राष्ट्रीय महामार्ग शेजारी पाणी पिण्याच्या बहाण्याने बकर्यांची चोरी
सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गा शेजारी असलेल्या शिगावे मळ्यातील युवराज सिध्दगोंडा शिगावे यांच्या चरण्यासाठी सोडलेल्या दोन शेळ्या व एक पालवे यांची दिवसा चोरी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गा शेजारी शिगावे मळा असून शिगावे यांचे घर ही तेथेच आहे. सकाळी साडे अकराच्या दरम्यान आपल्या म्हैशी व शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. त्यावेळी …
Read More »श्री एकदंत युवक गणेश मंडळाची मुहुर्तमेढ उत्साहात
बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्यावतीने श्री कृष्णा जन्माष्टमीचे औचित्य साधून शुक्रवार दि. 19/8/2022 रोजी सकाळी 8:30 वाजता गणेश मंडळाची मुहुर्तमेढ भटजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पुजा करून रोवण्यात आले. यावेळी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक आप्पाजी कुंडेकर यांच्याहस्ते पुजा करण्यात आले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta