बेळगाव : बेळगाव शहराच्या टिळकवाडी तिसर्या रेल्वे गेटवरील अद्यावत रेल्वे उड्डाणपुलाचे आज खा. मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ केला होता. आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य …
Read More »ऊसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये घेणारच
रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार : १५ ला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. बेळगाव जिल्ह्यात खासगी आणि सहकारी तत्त्वावरील लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि उद्योगपतींचे २९ साखर कारखाने आहेत. त्यांच्यात एकजूट असल्याने आज तागायात कुणीही दर जाहीर केलेला नाही. दर जाहीर केल्या …
Read More »जनसंकल्प यात्रेत भाजप नेत्यांचा कॉंग्रेसवर जोरदार हल्ला
भारत जोडो यात्रेविरुध्द जनसंकल्प यात्रा, एससी, एसटी आरक्षण वाढीचे भांडवल बंगळूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, जनसंकल्प यात्रेला रायचूर येथे चालना देऊन कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. त्यांनी ‘एससी/एसटी आरक्षण वाढ’ हा त्यांच्या सरकारचा ट्रम्प कार्ड बनवला आहे. रायचूर तालुक्यातील गिल्लेसूगुर गावातून सुरू झालेल्या जनसंकल्प यात्रेदरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह …
Read More »बंगळूरात छत कोसळून दोन कामगार ठार, तीन जखमी
बंगळूर : “बंगळुरमध्ये मंगळवारी (ता. ११) एका इमारतीचे छत कोसळून दोन जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. बंगळुरच्या महादेवपूर येथील हुडीजवळ मंगळवारी सकाळी इमारतीचे छत खाली कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २७ …
Read More »अटक झाली तरी चालेल पण काळ्या दिनी सायकल फेरी काढणारच
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : अटक झाली तरी चालेल पण 1 नोव्हेंबर काळ्या दिनी विराट मूक मोर्चा आणि सायकल फेरी काढणारच असा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक झाली. त्यावेळी बोलताना …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची गुरुवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सभा गुरूवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीत २१ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जनजागृती मोहीमे संदर्भात तसेच १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणी सदस्यांनी …
Read More »दीपावलीच्या विशेष खरेदीसाठी गृहशोभातर्फे प्रदर्शनाचे 14 पासून आयोजन
बेळगाव : वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांचे स्टॉल्स आयोजित करून ग्राहकांना वेगळी पर्वणी देणाऱ्या ‘गृहशोभा’ या बेंगलोरस्थित आयोजकातर्फे बेळगावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दि. 14 ते 23 ऑक्टोबर दरम्यान खानापूर रोडवरील मंगल मेटल शेजारच्या खुल्या जागेत १० दिवस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 70 हून अधिक मोठे स्टॉल्स …
Read More »महाराष्ट्रातून विक्रीसाठी आलेला अर्धा किलो गांजा जप्त
निपाणी पोलिसांची कारवाई : आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातून दुचाकीवरून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या एका युवकाला मोठ्या शिताफीने निपाणी पोलिसांनी त्याला अटक केल्याची घटना मंगळवारी (ता.११) घडली. अमीर बशीर जमादार (वय २१ राहणार तेरवाड ता. शिरोळ) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे सहा हजार रुपये …
Read More »“गोल्डन स्क्वेअर”च्या बुद्धीबळपटूंची जिल्हास्तरावर बाजी : झाली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बैलहोंगलमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यनगर -बेळगाव येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या श्रद्धा करेगार, केएलएस स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या अदिती चिखलव्हाळे, अल्पसंख्यांक मोरारजी देसाई रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतन विजयकुमार पाटील, केएलएस …
Read More »नंदगड ग्रा. पं. मासिक सभेत पीडीओ गैरहजर, बैठक वादळी
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीची मासिक बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत ग्राम पंचायतीचे पीडीओ गैर हजर होते. यावेळी बैठकीत उपाध्यक्ष व सदस्यांनी ग्राम पंचायत पीडीओ आनंद भिंगे यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका असल्याने लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी बैठकीत ग्राम पंचायत सदस्यांनी मागणी केलेली माहिती जो पर्यंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta