शस्त्रासह दुचाकी ताब्यात : कागल पोलिसांची कारवाई निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या शस्त्रांची विक्री करणाऱ्या तरुणास कागल येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून २३ धारदार तलवारी एक दुचाकी असा सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजयसिंग तुफानसिंग कलानी (वय २२, रा. आश्रयनगर निपाणी) असे त्याचे नाव आहे. …
Read More »शॉर्टसर्किटने घराला आग; २५ आजाराचे नुकसान
निपाणी (वार्ता): येथील जत्राट वेस ₹मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनाजवळ असलेल्या नवीन शेरखाने त्यांच्या घराला दुपारी शॉर्टसर्किटने आग लागून त्यामध्ये संसार उपयोगी साहित्य खाक झाले आहे. या घटनेत शेरखाने यांचे २५ हजार रुपये नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून तात्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत घटनास्थळावरून …
Read More »पुण्यातील अपघातात शिरगुप्पीच्या तरुणाचा जागीच मृत्यू
निपाणी (वार्ता) : पुण्याजवळील एका अपघातामध्ये सिद्धार्थ पांडुरंग जाधव (वय ४४ रा. माळभाग शिरगुपी) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. सूत्रांच्या माहितीवरून असे समजते, सिद्धार्थ हा ट्रक ड्रायव्हर असून तो काल आपला मालवाहू ट्रक घेऊन पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येत असता पुण्यापासून काही अंतरावर …
Read More »बेळगावात जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी
बेळगाव : बेळगावात दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेतर्फे प्रख्यात समाजसेवक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांची 157 वी पुण्यतिथी रविवारी संयुक्त महाराष्ट्र चौकात गांभीर्याने पाळण्यात आली. बेळगावातील नाना शंकर शेठ मार्ग, खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आज रविवारी प्रख्यात समाजसेवक, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकर …
Read More »खानापूरात टिप्परसह अवैध वाळू जप्त
खानापूर : खानापूर पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त केल्याची घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील देसूर गावातून चोर्ल्याकडे एका टिप्परमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात होती. खानापूर पोलिसांनी विशिष्ट माहितीवरून छापा टाकून मालासह लॉरी जप्त केली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली आहे. हा टिप्पर एसजे डेव्हलपरचा असून त्याचा …
Read More »जेरेमी लालरिनुंगाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण भरारी!
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. या स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. महत्वाचं …
Read More »संजय राऊत ईडीच्या ताब्यात
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. खासदार संजय …
Read More »खानापूर तालुक्यात कुंभार समाजाकडून नागपंचमीसाठी नागमुर्ती तयार
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे दरवर्षी होणार्या नागपंचमी सणासाठी खानापूर तालुक्यातील कुंभार समाजाकडून नागमुर्ती तयार केल्या जातात व घरोघरी या नागमुर्तीची मनोभावे पुजा केली जाते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी, सिंगीनकोप, तोपिनकट्टी, निट्टूर, गणेबैल, नंदगडसह अनेक गावातील कुंभार समाज नागपंचमीसाठी शेडू व काळी मातीचे मिश्रण करून त्या चिखलातून सुरेख अशा शेडूमिश्रीत मातीचे …
Read More »हुपरीतील सख्खे भाऊ एनआयएच्या ताब्यात
कोल्हापूर : हुपरी येथे आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने टाकलेल्या छाप्यात दोघा तरूणांना ताब्यात घेतले आहे. दोघे तरूण सख्खे भाऊ असून पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण एका फौंडेशनच्या माध्यमातून हुपरी रेंदाळ परिसरात कार्यरत आहे. तो एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ताब्यात …
Read More »बेळगावसह तीन ठिकाणी एनआयएचे छापे; तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
बेंगळुरू: एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) ने राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आणि तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. आज पहाटे उत्तर कन्नडमधील बेळगाव, तुमकूर आणि भटकळ येथे छापे टाकणाऱ्या एनआयएच्या पथकाने तीन ठिकाणी प्रत्येकी एक अशा तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta