Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

सदलग्यातील ड्रेनेज प्लँटला शासकीय अधिकाऱ्यांची भेट : संतप्त शेतकऱ्यांनी विचारले प्रश्न

सदलगा : सदलग्यातील भूमीगत सांडपाणी व्यवस्थेचे ड्रेनेज प्रक्रिया केंद्राला कर्नाटक शासकीय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रो. मोहनकुमार आणि प्रो.राव, केयुडब्ल्युएस धारवाडचे मुख्य अभियंता श्री. टी. एन्. मुद्दुराजण्णा, केयुडब्ल्युएस बेळगांवचे कार्यकारी अभियंता सुरेश मोरवाल, केयुडब्ल्युएस चिकोडीचे सहायक कार्यकारी अभियंता आर के उमेश आदींचा या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होता. …

Read More »

सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेच्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ

  सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेसाठी ग्रामपंचायत एन.आर.जी. फंडातून मंजूर झालेल्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला. सुरुवातीला एसडीएमसी अध्यक्ष शंकर कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सनदी, शोभा कोळी, एसडीएमसी सदस्या प्रियंका कोळी, शिक्षिकांच्या हस्ते जागेचे …

Read More »

देवेंद्र जिनगौडा शाळेत विद्या भारती विज्ञान मेळाव्याचे आयोजन

बेळगांव : शिंदोळी येथील गोपाळ जिनगौडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित देवेंद्र जिनगौडा इंग्रजी शाळेमध्ये विद्याभारती बेळगांव जिल्हास्तरीय ज्ञान विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जिनगौडा, उपाध्यक्ष संदीप चिपरे, विद्याभारती प्रांत अध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी कुंतुसागर …

Read More »

अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या बनावट फेसबुक अकाऊंटसवर कारवाई करा

  बेळगाव : फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून पत्रकार, महिला, नागरिक यांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे केली आहे. शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 रोजी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन काही फेसबुक अकाऊंटची चौकशी करा, अशी …

Read More »

कॅन्टोन्मेंट बोर्ड उभारणार बहुमजली व्यापारी संकुल!

  बेळगाव : महसूल वाढविण्यासोबत थकबाकी वसूल करण्यासाठी पाऊले उचलण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याकरिता बहुमजली व्यापारी संकुल उभारणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पाणी समस्येबाबत चर्चा करताना 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कक्षेत कॅन्टोन्मेंट …

Read More »

आजाराला कंटाळून युवतीची आत्महत्या

  खानापूर : ओलमनी येथील युवतीने आजाराला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. अंकिता पूनम पन्नाप्पा नाईक (वय23) असे तिचे नाव आहे. अंकिता महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बऱ्याच वर्षांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होती. काही दिवसांपासून त्रास होत होता. यातूनच तिने विष प्राशन केले. तिच्या आईने खानापूर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती …

Read More »

अनमोड नाक्यावर मुद्देमालासह मद्यसाठा जप्त

  खानापूर : अबकारी खात्याने गोवा बनावटीचा मद्यसाठा अनमोड नाक्यावर जप्त केला आहे याप्रकरणी दोघांना अटक करून मोटार व मुद्देमालासह जप्त केला आहे. अन्वर पाशा व उपलूर नागेश्वराराव रेड्डी (दोघेही आंध्रप्रदेश) अशी त्यांची।नावे आहेत. गोव्याकडून आंध्रप्रदेश कडे जात असलेल्या मोटारीची (टीएस 8 जीएस 9989) अनमोड नाक्यावर तपासणी केली असता त्यात …

Read More »

शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ

  बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय …

Read More »

हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू

भीमडा : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये बारमेर परिसरात सैन्य दलाचे ‘मिग’ हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोसळून या दुर्घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आगीचे मोठे लोळ उठले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यामध्ये विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे आणि …

Read More »

निपाणी येथे सटवाई देवी वार्षिकोत्सव साजरा

  निपाणी : येथील सटवाई रोडवरील सटवाई देवीचा वार्षिकोत्सव मंगळवारी साजरा करण्यात आला. श्रीमंत दादाराजे निपाणीकर व समराजलक्ष्मीराजे निपाणीकर यांच्या हस्ते सटवाई देवीस अभिषेक घालून पूजा करेण्यात आली. यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री शशिकला जोल्ले यांनी या मंदिरास भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. सटवाई देवी उत्सव कमिटीच्यावतीने …

Read More »