Friday , October 18 2024
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊन वाढीचे संकेत

बेंगळूर : राज्यात लॉकडाऊन वाढीबाबत चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निर्यात व्यवसायांना परवानगी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. राज्यात सध्या ७ जूनपर्यंत …

Read More »

मनपा कर्मचाऱ्यांची लाॅकडाऊनसंदर्भात जनजागृती

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाला थोपविण्यासाठी सरकारने येत्या शुक्रवारपासून लागू केलेल्या सलग तीन दिवसांच्या कडक लाॅकडाऊनसंदर्भात मनपा आयुक्तांच्या आदेशावरून आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रभाग क्र. 20 आणि 21 मध्ये जनजागृती मोहीम राबविली.महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक संजय पाटील व नितिन देमट्टी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मार्शल्सनी येत्या दि. …

Read More »

कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांची अडकूरला भेट

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर जिल्हा पोलिस जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे साहेब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडकूर (ता. चंदगड) येथे भेट दिली.यावेळी पो. अधिक्षक श्री. बलकवडे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवल्या. अडकूर कोरोना हॉट स्पॉट गाव बनले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. …

Read More »

दोडामार्ग पोलिस निरीक्षक नदाफ यांची चोरट्या दारू विरूद्ध धडक मोहीम लाखोंची दारू जप्त;
चंदगडच्या दोघांना अटक

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : दोडामार्गचे नुतन पोलिस निरीक्षक आर. जी. नदाफ यानी चोरट्या दारू वाहतूकीविरोधात धडक कारवाई करत चंदगड तालुक्यातील दोघाना अटक करुन मोठा दारूसाठा जप्त केला.गेल्या काही वर्षांपासून गोवा राज्यातून दोडामार्ग येथून चंदगड व बेळगावकडे दारूची अवैध्यरित्या वाहतूक होत होती. याची माहिती पोलिस दोडामार्ग पोलिसाना समजली. यापूर्वी याकडे …

Read More »

प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणावर नियुक्ती

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख आणि कला शाखेचे डीएन प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची नियुक्ती कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणवर सदस्य म्हणून कर्नाटक सरकारने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कायदा सेवा प्राधिकरण कार्यरत आहे या मंडळावर समाजातील विविध स्तरातून समाजशील …

Read More »

मोठी बातमी ! विषारी दारू पिल्यामुळे तब्बल 85 जणांचा मृत्यू; 33 जणांना अटक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गावात विषारी दारू पिल्याने तब्बल 85 जणांचा मृत्यू झाला आहे. अलीगडमधील करसुआ गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांचा …

Read More »

सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करा : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : बेळगावातील कोविड इस्पितळाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बुधवारी खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक घेतली. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. बेळगावातील कोविड रुग्णांना दिले जाणारे उपचार, इस्पितळांतील सुविधा, उपचारांसाठी आकारले जाणारे शुल्क व अन्य विषयांवर चर्चा करून …

Read More »

दांडेलीत नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; ६ जणांना अटक

दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम राबवून नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करून लाखो रुपये मूल्याच्या नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे. दांडेलीतील डीडीएल वनश्री भागातील शिवाजी कांबळे नामक एकाच्या घरातून या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. ४.५ लाख …

Read More »

कोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करावा, चांगले काम करीत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण इतर गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष स्थापन करावेत, तसेच तपासण्या वाढवून बाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात …

Read More »

बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर

बेळगाव : बेळगावातील बिम्स इस्पितळाला उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच भेट देऊन तेथील गैरकारभाराबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा बिम्सला लवकरच भेट देणार असल्याचे नियोजन आहे. मात्र या पार्श्वभूमीवर बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर गेल्याने उलट–सुलट चर्चेला ऊत आला आहे. कोविड रुग्णांसह अन्य रुग्णांनाही बिम्समध्ये व्यवस्थित …

Read More »