Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेला कित्तूर बंद यशस्वी!

  बेळगाव : कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावात वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या राजवाड्याची प्रतिकृती बनविण्यास तीव्र विरोध दर्शवत आज कित्तूर बंदची हाक देण्यात आली होती. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आज पुकारण्यात आलेला बंद संपूर्णपणे यशस्वी झाला आहे. बच्चनकेरी गावातील 57 एकर जमीन कित्तूर किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. सदर जमीन कित्तूर …

Read More »

यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता श्रमदानातून दुरुस्त!

  बेळगाव : यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता सुरुते ग्राम पंचायतकडून श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आला. चार वर्षाच्या मागील अतिवृष्टीमुळे यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता बर्‍याच वर्षापासून खराब व झालेला रस्ता त्याचबरोबर मोठ-मोठी भगदाड पडलेली आहेत. यामुळे प्रवास करणे धोकादायक झाले आहे. लहान मोठे अपघात घडलेले आहेत. त्याचबरोबर या गावातील बससेवा गेले तीन-चार वर्ष बंद …

Read More »

मराठा युवक संघातर्फे भव्य निमंत्रितांची जलतरण स्पर्धा 21 रोजी

  बेळगाव : मराठा युवक संघातर्फे आबा स्पोर्ट्सच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी 17 व्या निमंत्रितांच्या भव्य आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी झालेल्या संघाच्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत …

Read More »

आंबोळी मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी अर्जून नाईक, उपाध्यक्षपदी वंदिता चोर्लेकर

  खानापूर (प्रतिनिधी) : आंबोळी (ता. खानापूर) येथील मराठी प्रौढ प्राथमिक मराठी शाळेत नवीन एसडीएमसी कमिटीची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम सदस्या सौ. लक्ष्मी ओमाणा नाईक होते. यावेळी बैठकीला ग्राम पंचायत सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत एसडीएमसी कमिटीची निवड होऊन अध्यक्षपदी अर्जुन अप्पी नाईक …

Read More »

खानापूर तालुका सरकारी दवाखान्यावर मराठी भाषेत फलक लावा

  तालुका म. ए. समितीचे आरोग्याधिकार्‍यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुका सरकारी दवाखाना आरोग्याधिकारी श्री. नांद्रे यांना कन्नडसोबत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत निवेदन देण्यात आले. 10 ऑगस्ट पूर्वी सदर कन्नड फलकावर मराठीतूनही नामफलक लावावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे निवेदन देण्यात …

Read More »

सोनिया गांधी व राहुल गांधींच्या चौकशीनंतर नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा

  नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून दिल्लीतील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सध्या नॅशनल हेराल्डच्या चौथ्या मजल्याची ईडीकडून झडती घेतली जात आहे. याच मजल्यावर वृत्तपत्राचं कार्यालय आहे. …

Read More »

ओतोळी मराठी शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : ओतोळी (ता. खानापूर) प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड नुकतीच पार पडली. एसडीएमसी निवड कमिटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य परशराम गावडे होते. यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक सौ. वंदना देसाई यांनी केले. त्यानंतर एसडीएमसी कमिटीविषयी पालकांना मार्गदर्शन केले. एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्ष पदी संजय रामणीचे …

Read More »

निपाणी तालुक्यातील सव्वादोन लाख घरांवर फडकणार ’तिरंगा’

  तिरंग्यांची निर्मिती सुरू : ’हर घर झंडा’ उपक्रम निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सर्वत्र ’हर घर झंडा’ उपक्रम 11 ते 17 ऑगस्टदरम्यान राबविण्यात येत आहे. याची निपाणी तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यातील सुमारे सव्वा दोन लाख घरांवर तिरंगा या कालावधीत झळकणार आहे. तिरंगा तयार करण्याचे काम …

Read More »

कुर्लीच्या विजयने दिले 1 हजार सर्पांना जीवदान!

नागपंचमीला देव : वर्षभर शत्रू आहे का? निपाणी (विनायक पाटील) : सर्प म्हटले की भल्याभल्यांना अंगावर शहारे येऊन, घाम फुटतो, भीती वाटते. भीतीपोटी तत्काळ सर्पास मारण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु कुर्लीतील (ता. निपाणी) छायाचित्रकार व सर्पमित्र विजय नार्वेकर यांच्याशी संपर्क साधल्यास तत्काळ साप पकडतात. त्यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक सर्पांना …

Read More »

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये नागपंचमी निमित्त अष्टकुल नागदेवतेची विशेष पूजा अलंकार अभिषेक करण्यात आले. सकाळी सहा वाजता विशेष रुद्रभिषेक नागमूर्तीला करून दर्शनाची सुविधा करण्यात आली. सकाळपासून मंदिरामध्ये अष्टकुल नागदेवतेच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.

Read More »