ग्राम पंचायत सदस्या मनीषा परिट : ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी कोगनोळी : येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या गावातील गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गावातील सर्व गटारी स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी उत्तम पाटील …
Read More »आयपीएलचा विजेता गुजरात की राजस्थान?
अहमदाबाद : दोन प्रतिभावान कर्णधार, दोन तुल्यबळ संघ, एका संघाचे पदार्पणातच जेतेपदाचे लक्ष्य, तर दुसऱ्या संघाचे १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न. सामना एक, पटकथा अनेक. आज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १५व्या हंगामाच्या अंतिम लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचा इतिहास घडवण्याचा …
Read More »तर सीमाभागात शिवसेना म्हणून पुढे येऊ : संजय राऊत
बेळगाव : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावातून भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला समितीतील दुहीबाबत कानपिचक्या दिल्या आहेत. आगामी काळात शिवसेना म्हणून पुढे येऊ असे त्यांनी म्हटले. गेले दोन दिवस राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी त्यांची सभा कागल येथे होणार आहे. एकीकरण समितीतील दुहीवर …
Read More »सीमाप्रश्नी लवकरच तज्ञ समितीची बैठक : मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही
बेळगाव : सीमाप्रश्नी तज्ञ समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे. तसेच बैठकीनंतर सीमाप्रश्नी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. सीमाप्रश्न लवकर सुटण्यासाठी पावले उचलू, अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सीमाप्रश्नी तज्ञ कमिटीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे मंत्री जयंत पाटील यांची …
Read More »निपाणीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्कार
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र १३ व्या राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज, रविवारी (ता. २९) कोल्हापुरात होत आहे. त्यात ‘सकाळ’चे येथील बातमीदार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. भाजपचे प्रवक्ता, माजी …
Read More »शहीद जवानाला बेळगावात मानवंदना
बेळगाव : शहीद जवान प्रशांत जाधव याला बेळगाव विमान तळावर अभिवादन करण्यात आले. लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव (वय 27) हा शहीद झाला होता. दरम्यान, शहिद जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव रविवारी (दि. 29) …
Read More »“…..आर्य कि द्रविड” वरून मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यात जुंपली
हेडगेवारांच्या अभ्यासक्रमाला विरोध, पाठ्यक्रमाच्या वादावर लवकरच तोडगा बंगळूर : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आरएसएसच्या मूळतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सिध्दरामय्या यांना, ‘तुम्ही द्रविड किंवा आर्य’ ते स्पष्ट करा असे आवाहन केले. अभ्यासक्रमाच्या वादावर लवकरच तोडगा काढण्याची त्यांनी ग्वाही दिली. मला सिद्धरामय्या यांना विचारायचे आहे, ते कुठून …
Read More »गोव्याला फिरायला जाताय, सावधान!
चंदगडच्या तरूणांना गोव्यात ब्लॅकमेल करून लुटले, संरक्षणासाठी चंदगड पोलिसाकडे धाव तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गोव्याला फिरायला गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना एका खोलीत कोंडून त्यांचा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २६) गोव्यात घडली असून या घटनेनंतर पीडित तरुण गेले …
Read More »खानापूर तालुका समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे रोजी राजा शिवस्मारक येथे बोलाविण्यात अली आहे. या बैठकीत 1 जून रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे, आगामी तालुका व जिल्हा पंचायत निवडणूका संदर्भात चर्चा करणे, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची सीमाप्रश्न उच्चधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड …
Read More »तुरमुरी येथील चोरी प्रकरणी दोघा चोरट्यांना अटक
वडगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई बेळगाव : तुरमुरी गावात 8 एप्रिल रोजी झालेल्या चोरी प्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. वडगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta