विविध कार्यक्रमाचे आयोजन : कव्वालीचा बहारदार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरूसास अभंगस्नानाने सुरुवात झाली होती. यानंतर शनिवारी (ता.२९) दर्गा, समाधीस्थळी सनई चौघडे वादनास सुरुवात झाली. उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई …
Read More »1 नोव्हेंबर काळ्यादिनाच्या सायकल फेरीत सामील व्हा!
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना अंमलात आली. पूर्वीच्या मुंबई प्रांतातील बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील तसेच हैद्राबाद संस्थानातील बिदरमधील मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काळादिन पाळण्यात येतो आणि संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार …
Read More »चिखले-आमगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करावा
खानापूर : खानापूर तालुक्यातील चिखले-आमगाव रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. खानापूर तालुक्यातील चिखले- आमगाव हा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. चिखले गावाच्या रस्त्याचे यापूर्वी डांबरीकरण झाले आहे. मात्र चिखलेपासून आमगावला जाणाऱ्या संपर्क रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर …
Read More »बेळगाव-चोर्ला घाटात कारचा स्फोट
खानापूर : धावत्या कारमध्ये स्फोट होऊन बघता बघता कारने पेट घेतल्याची घटना बेळगावजवळील चोर्ला घाटात घडली. गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कारला आज शनिवारी पहाटे चोर्ला घाटात आग लागली. नंतर कारने पूर्णपणे पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी लागलीच गाडीबाहेर धाव …
Read More »शालेय विद्यार्थिनींच्या वतीने अनोख्या पद्धतीने दिपावली सण साजरा
बेळगाव : श्री मंगाई देवी युवक मंडळ-मंगाई देवस्थान या मंडळातील दोन शालेय विद्यार्थिनींनी दिपावलिनिमीत्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला. स्फुर्ती विश्वनाथ सव्वाशेरी (ई. 7 वी बालिका आदर्श स्कूल) राहणार वडगाव व प्रणाली परशराम कणबरकर (ई.10वी डिवाईन मर्सी) राहणार मच्छे या दोन विद्यार्थिनींनी त्यांना शिवजयंती उत्सवावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या …
Read More »स्व कौशल्य माणसाला उच्च शिखरावर पोहोचविते : डॉ. विद्या जिर्गे
बेळगाव : बेळगाव मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे राष्ट्रीय शिक्षण नीती (एन.ई.पी.) पाठ्यक्रमानुसार शिकणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांच्यासाठी “स्किल डेव्हलपमेंट अँड रिसर्च मेथोडोलॉजी “विषयावर एकदिवशीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून खानापूर सरकारी पदवी महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रमुख डॉ. विद्या जिर्गे या उपस्थित …
Read More »शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथे ऊसाला आग
चार लाखाहून अधिक नुकसान : शेतकरी अडचणीत निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथील सुमारे तीन एकर ऊसाला अचानक आग लागल्याने चार लाखावर अधिक नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी घडली. हुपरी रस्ता लगत असलेल्या संदीप माळी यांचे दोन एकर तर सतीश मधाळे यांचे एक एकरच्या ऊसाला शॉर्टसर्किट मुळे …
Read More »स्वयंपाक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन नर्सिंग विद्यार्थ्याचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी येथे स्वयंपाक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका नर्सिंग विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुडलगी येथील पी. एन. मुगलखोड नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी श्रीधर पत्ती (१९) या स्फोटात ठार झाल्याचे समजते. भाड्याच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्वयंपाक घरात सिलेंडरचा चुकून स्फोट झाला. मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
Read More »मांडीगुंजीत बाल शिवाजी युवक मंडळातर्फे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर “प्रश्नमंजुषा” स्पर्धा
खानापूर : मौजे मांडीगुंजी येथे खास दीपावली निमित्त 27 ऑक्टोबर रोजी बाल शिवाजी युवक मंडळातर्फे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “प्रश्नमंजुषा” स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एक गटात चार विध्यार्थी अशा प्रमाणे, एकूण 10 गटांनी भाग घेतला होता. प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात AP या गटाने प्रथम क्रमांकाची बाजी …
Read More »खानापूर तालुक्यातील रस्ते पीडब्ल्यूडी खात्याने त्वरीत करावे
रयत संघटनेचे अधिकारी वर्गाला निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिमागासलेला तालुका असुन तालुक्यातील रस्त्याकडे पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष होत आहे. सध्या तालुक्यातील ऊस तोडणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊसाची वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी खानापूर तालुका संघटनेच्यावतीने बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कचेरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta