खानापूर : गेल्या दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता. खानापूर येथील विद्यार्थिप्रिय आदर्श श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे निधन झाले, त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती, आपल्या आयुष्यच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाचन केले, त्यांना कविता, संगीत नाट्य व गीतरामायण सारखे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये रुजविले, चन्नेवाडी गावात छोटेसे ग्रंथालय व्हावे असा …
Read More »महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या विकासाचे द्योतक : डॉ. सोनाली सरनोबत
बेळगाव : शिनोळी ता. चंदगड येथील– व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कार्वे पाटणेफाटा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात चौथे पुष्प गुंफण्यासाठी भाजपा महिला मोर्चा, कर्नाटक राज्याच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन …
Read More »ठळकवाडी हायस्कूलचे विद्यार्थी भेटले पन्नास वर्षांनी
बेळगाव : साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलच्या 1974 -75 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. या कार्यक्रमात हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. आर. आर. कुडतुरकर आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या अविस्मरणीय मेळाव्याची सुरुवात कुडतुरकर सर, दीपक परुळेकर, एस के इ …
Read More »सी. टी. रवींच्या खटला रद्द करण्याच्या याचिकेची सुनावणी १३ पर्यंत लांबणीवर
रवी यांना तात्पुरता दिलासा बंगळूर : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्याचा खटला रद्द करण्याच्या आमदार सी. टी. रवी यांच्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारी १३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. न्यायालयात युक्तिवाद करताना, ही घटना विधान परिषदेत घडली असल्याने, त्यांच्या अशिलाला मुक्ती मिळेल, असे रवी यांचे प्रतिनिधित्व …
Read More »येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना होणार; बैठकीत निर्णय
बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 27/01/2025 रोजी सायंकाळी येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला येळ्ळूर मधील आजी- माजी सदस्य ग्राम पंचायत तसेच गावातील, जेष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा …
Read More »मायक्रो फायनान्सचा छळ रोखण्यासाठी अध्यादेश; मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी
बंगळूर : राज्यात मीटर व्याज धंदा आणि थकबाकी वसुलीच्या नावाखाली पिळवणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश सूक्ष्म वित्त कर्जाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कर्नाटक मायक्रो फायनान्स संस्था नियमन विधेयक अध्यादेशाद्वारे लागू …
Read More »बेळगावात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे धाडसत्र
बेळगाव : चार दिवसापूर्वी आयकर खात्याने बेळगावात उद्योजक आणि व्यावसायिकांवर धाडसत्र राबविले होते. आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. बेळगावचे उपनिबंधक सचिन …
Read More »बेळगाव महापालिकेच्या जुन्या कार्यालयात भीषण आग
महत्त्वाची कागदपत्रे जळाली बेळगाव : रिसालदार गल्लीतील जुन्या महापालिका (तहसीलदार कार्यालय) कार्यालयातील गोदामाला अचानक आग लागण्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाला आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. बंद असलेल्या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आगीचा सदर प्रकार उघडकीस आला. …
Read More »मायलेकीचा मृत्यूमुळे श्वानाने खाणेपिणे सोडले!
बेळगाव: प्रयागराज महाकुंभमेळ्यात वडगाव येथील मेघा हत्तरवाठ आणि ज्योती हत्तरवाठ या मायलेकीचा मृत्यू झाला. या घटनेचा धसकाच्या चक्क घरातील श्वानाने घेतला असून त्याने खाणेपिणे सोडले आहे. घरातील मंडळी प्रयागराजला गेल्यापासून सनी नावाचा श्वान अस्वस्थ झाला. गेलेल्या दिवसापासून त्याने खाणेपिणे सोडले. एकूण श्वानाच्या वागण्यातून या दुर्घटनेचा अंदाज वर्तवला असल्याची व्यथा …
Read More »महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!
प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी होऊन तब्बल 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता महाकुंभमध्ये मोठी आग लागली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. महाकुंभमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta