बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले आहे. या बैठकीत हुतात्मा दिन, दिल्ली …
Read More »खानापूर ‘क्रांती सेना’, ‘समृद्धी’ सोसायटी विरुद्ध ठेवीदारांची तक्रार
बेळगाव : खानापूर येथील क्रांती सेना को-ऑप. सोसायटी आणि समृद्धी को-ऑप. सोसायटी या दोन पतसंस्थांच्या कारभाराची चौकशी करून या दोन्ही पतसंस्थांकडून सर्वसामान्य व गरीब ठेवीदारांच्या थकीत असलेल्या ठेवी त्यांना परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी खानापूर येथील श्रीराम सेना हिंदुस्थान आणि आंबेडकर युवा मंच यांनी तहसीलदारांकडे केली आहे. श्रीराम सेना …
Read More »१ नोव्हेंबर २०१६ काळ्या दिनाच्या खटल्यातून म. ए. समिती कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : आज तिसऱ्या प्रथम दर्जा सत्र न्यायालयाने (जेएमएफसी lll) १ नोव्हेंबर २०१६ रोजी काळ्या दिनाच्या खटल्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निर्दोष मुक्तता केली. १ नोव्हेंबर रोजी सायकल फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काकेरू चौक शहापूर येथे राज्योत्सवानिमित्त लावण्यात आलेली लाल पिवळ्या पताका व लाल पिवळा झेंडा फाडणे, कर्नाटक सरकार …
Read More »कॅपिटल वन करंडक बक्षीस समारंभ संपन्न; वंदना गुप्ते यांनी नाट्य रसिकांची मने जिंकली
बेळगाव : गेले 2 दिवस सुरू असलेल्या कॅपिटल वन करंडकासाठीच्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती वंदना गुप्ते व प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत पार पडला. बेळगावमध्ये सातत्याने 13 वर्षे सातत्याने सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या खुमासदार शैलीमधून वंदना गुप्ते यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर श्री. प्रसाद पंडित …
Read More »साठे प्रबोधिनीतर्फे साहित्यिक गप्पाटप्पांचा कार्यक्रम; लेखक डॉ. शरद बाविस्कर यांची भेट
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक, भुरा या चरित्रात्मक कादंबरीचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्यासोबत गप्पाटप्पांचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर उपस्थित होते. त्यांच्या …
Read More »गडहिंग्लज व नेसरी अंनिसतर्फे सर सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक परिसराची स्वच्छता!
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी महापुरुष होते. प्रत्येक रणसंग्रामात शत्रू सैन्याला झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंजावात वादळ होते. स्वराज्याची दीर्घकाळनिष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ बांधलेल्या नेसरी जवळील स्मारकाची व त्या परिसराची नवीन वर्षाच्या निमित्ताने अनिंसच्या गडहिंग्लज शहर शाखा व नेसरी …
Read More »छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या वाहनावर नक्षलवाद्यांकडून स्फोटक हल्ला; 9 जवान शहीद
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून त्यामध्ये 9 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरले होते. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कुत्रु ते बेद्रे मार्गावर करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी …
Read More »लक्ष्मीकांत पाटील यांचा मुरगुड येथे सत्कार
निपाणी : लोकनेते स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल, मुरगुड यांच्यावतीने, मा. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव, सीमाभाग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बेळगाव सीमाप्रश्नाच्या दिर्घ अंदोलनाला नव्याने चालना देण्यासाठी आणि …
Read More »समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची महत्त्वाची भूमिका
प्रा. डॉ. अच्युत माने; निपाणीत पत्रकार दिन निपाणी (वार्ता) : पत्रकार हा समाजातील आरसा असतो. त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बातमी मागील बातमी काढण्याची आता गरज निर्माण झाली आहे. देशात वाढलेल्या राजकतेवर अंकुश ठेवण्यासाठी आता लेखणी करावी लागेल. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत …
Read More »अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पुन्हा होणार अनावरण!
बेळगाव : बेळगावातील अनगोळ येथे काल सायंकाळी भव्य मिरवणूक काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मात्र, हे अनधिकृत असून शिष्टाचारानुसार छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आणखी एकदा दणक्यात करण्यात येणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. बेळगावातील अनगोळ येथे रविवारी सायंकाळी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta