Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदावरून रमेश कत्ती पायउतार!

  बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकेत मोठ्या प्रमाणात घडलेल्या घडामोडीमुळे बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काल बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून बँकेच्या महाव्यवस्थापकांकडे रमेश कत्ती यांनी आपला राजीनामा सादर केला. अध्यक्ष रमेश कत्ती यांच्याविरोधात १४ संचालकांनी बंड पुकारून अविश्वास ठराव मांडला होता. अविश्वास ठरावाची …

Read More »

सीमाप्रश्न सोडवून मराठी भाषिकांचे स्वप्न साकार करावे : माजी महापौर मालोजीराव अष्टेकर

  बेळगाव : “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 13 वर्षापासून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित त्यासाठी लढा द्यावा. अनेक संघटनांनी तसेच साहित्य संमेलने यातून ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवावे लागले मराठी भाषेला दर्जा मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद पसरला. केंद्र सरकारने अशाच प्रकारे …

Read More »

सीमाप्रश्नी युवकांनी आता आरपारची लढाई लढावी…

  युवा समिती सैनिकांच्या बैठकीतील सूर बेळगाव : काल गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा मुहूर्त साधून बेळगाव व सीमाभागातील युवकांनी सीमाप्रश्न व त्या संदर्भात होणाऱ्या घडामोडी यांची चर्चा करण्यासाठी मराठा मंदिर येथे एक बैठक आयोजित केली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर हे होते. या …

Read More »

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा बेळगावात?

  बेळगाव : बेळगावात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शताब्दी महोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. याबाबत राज्याचे कायदा व संसदीय खात्याचे मंत्री एच. के. …

Read More »

रस्त्यांच्या दुरूस्तीसंदर्भात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदन

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. विशेषतः वेंगुर्ला रोड – रायचूर – बाची हा राज्य महामार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावर बेळगाव – सावंतवाडी तसेच बेळगाव परिसरातील गावाकडे नेहमी अवजड वाहनांची वाहतूक असते. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या ठिकाणी लहानमोठे अपघात घडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना या …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

  बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार दंड अशी शिक्षा विशेष पोक्सो न्यायालयाने आज (ता. ३) ठोठाविली. श्रीसंगम कृष्णात निकाडे (रा. कुर्ली, ता. चिक्कोडी) असे आरोपीचे नाव आहे. १४ जुलै २०१६ मध्ये प्रकरणाची नोंद झाली आहे. याबाबत माहिती अशी की, निपाणी ग्रामीण …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे मराठी लेखन, वाचन व अभिनय कौशल्य कार्यशाळा

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे मुलांना लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी, मुलांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळे छंद जोपासावेत. त्यांचे लेखन व वाचन कौशल्य विकसित व्हावे, मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी लेखन, वाचन व अभिनय कौशल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक …

Read More »

जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याचा भव्य शुभारंभ!

  बेंगळुरू : जगप्रसिद्ध म्हैसूर दरशोत्सवाचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नाडोज हंप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. चामुंडी मातेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाही परंपरेनुसार दसरा मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. चामुंडी टेकडीवर बांधलेल्या पारंपरिक मंडपात चामुंडी मातेच्या मूर्तीची विशेष …

Read More »

गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी

  खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी गणेबैल टोल नाक्यावर रास्ता रोको करून धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील …

Read More »

जाहलो खरेच धन्य…! मराठी भाषेला अभिजात दर्जा

  केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत …

Read More »