Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मूर्ती कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने माफी मागावी : मृणाल हेब्बाळकर

  बेळगाव : राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पडझडीबाबत भाजप नेते मौन बाळगून आहेत, अशी गंभीर टीका काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी केली आहे. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांनी बेळगाव …

Read More »

खर्गे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप

    बंगळुरू : काही दिवसांपूर्वीच कथित मुडा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले होते. त्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता मल्लिकार्जुन खर्गे यांचे कुटुंबिय सदस्य असलेल्या संस्थेला कर्नाटक सरकारने उद्योगांसाठी राखीव असलेली जमीन दिल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला …

Read More »

इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहाने संपन्न

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहाने पार पडला. श्री श्री गोकुलानंद मंदिरात आठवडाभर विविध कार्यक्रम संपन्न झाले. सोमवारी मध्यरात्री जन्माष्टमी उत्सवाची सांगता इस्कॉन चे अध्यक्ष भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या जन्माष्टमी वरील व्याख्यानाने झाली. तर मंगळवारी संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन व्यासपूजा …

Read More »

राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या वेटलिफ्टिंग टीमचे घवघवीत यश

  बेळगाव : म्हैसूर येथे झालेला कर्नाटक स्टेट वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत बेळगावच्या एकूण 16 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी स्वस्तिका मिरजकर हिने 87 वजनी गटात सुवर्णपदक, रोहित मुरकुटे यांने 55 किलो वजनी गटात सुवर्ण, समीक्षा मानमोडे हिने 59 किलो वजनी गटात सुवर्ण, आदर्श धायगोंडे याने 81 किलो वजनी …

Read More »

मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : मलप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाचा विचार करता धरणाची पूर्ण पातळी २०७९.५० फुटांच्या तुलनेत २०७८.१० फुटांवर पोहोचली आहे. मलप्रभा धरणात सध्याची आवक १० हजार क्युसेक आहे. धरणाची पातळी राखण्यासाठी मलप्रभा धरणातून पाणी सोडण्यात वाढ करण्यात येणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आज दिनांक २७-०८-२०२४ रोजी सायंकाळी …

Read More »

संत ज्ञानेश्वरांनीही विज्ञाननिष्ठ जाणिवेतून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला : प्रा. अशोक आलगोंडी

  कागवाड येथे ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे सामूहिक पारायण कागवाड : वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, व्रत-वैकल्य काढून टाकण्याचे महान काम केले. संत ज्ञानेश्वरांनीही विज्ञाननिष्ठ जाणिवेतून ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी व भगवत गीता या दोन ग्रंथांमध्ये अर्जुन आणि कृष्ण या दोघांचा सुसंवाद असला तरी जीवनाची महत्त्वाची मूल्ये, आचरणातील समीकरणे सुलभ करून …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार नाव नोंदणीची रितसर प्रक्रिया

  बुदिहाळचे वसंत पाटील यांची तहसीलदारांविरोधात तक्रार निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील शेत जमिनीच्या नाव नोंदणी विषयी खोटे मृत्युपत्र मृत्यू दाखले जोडले गेले आहेत, अशा आशयाची माहिती देत जंगम यांनी तहसीलदारांविरोधात शासनाच्या महसूल विभागासह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाला प्रतिउत्तर म्हणून बुदिहाळ येथील सदर जमीन पारंपरिक पद्धतीने करणारे …

Read More »

सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ हुतात्मा चौक बेळगाव मुहूर्तमेढ संपन्न

  बेळगाव : येथील हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून आगामी गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. प्रारंभी विधिवत पूजन संजय हेबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वश्री रामकुमार जोशी, शिवाजीराव हंडे, विजय मोहिते, शेखर हंडे, हेमंत सूर्यवंशी, शशिकांत देसाई, अशोक नाईक, राजपुरोहित, अशोक कलबुर्गी, कैलास पारिक, राजेंद्र हंडे, …

Read More »

डॉल्बीला कदापिही परवानगी नाही : पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी

  बेळगाव : बेळगावात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरेपूर प्रयत्न केले जात असतात. यावर्षीचा गणेशोत्सव ही भक्तीभावात आणि आनंदाने साजरा करावा. मात्र गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीसाठी कदापिही परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस …

Read More »

मोस्ट वाँटेड कैद्याची हिंडलगा कारागृहात रवानगी

  बेळगाव : कोट्यवधी रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करून धमकी देणाऱ्या मोस्ट वाँटेड कैद्याला सोमवारी रात्री नागपुरहून विमानाने बेळगावला आणण्यात आले. अकबर पाशा या मोस्ट वाँटेड कैद्याला नागपुर बेळगाव या विमानाने बेळगावात आणण्यात आले. अकबर पाशाचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत. नुकतेच बेळगाव न्यायालयाच्या आवारात …

Read More »