कोल्हापूर : मराठीतील ज्येष्ठ लेखक महादेव मोरे यांचे दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लेखक महादेव मोरे यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरण चालवली. जगण्यासाठी चाललेल्या विविध व्यापातूनही आपल्या साहित्य लेखणीत कधीही खंड पडू दिला नाही. कथा, कादंबरी, ललित अशा विविध साहित्य …
Read More »विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात मोबाईल केबल, फांद्यांचे विघ्न नकोत!
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातील काही गणेशोत्सव मंडळांनी येत्या 1 सप्टेंबर 2024 पासून मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये नेण्याचे नियोजन करत आहेत. यापुढेही सुट्टीच्या दिवशी शहर व उपनगरात अनेक मंडळांचे आगमन सोहळे होणार आहेत. शहरातील व प्रमुखतेने श्री …
Read More »खानापूर नगरपंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश
खानापूर : येत्या २६ तारखेला खानापूर नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. अध्यक्षपद व उपाध्यक्षपद ही दोन्ही सामान्य महिलासांठी राखीव होती यासंदर्भात खानापूरचे काँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी मा. उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि काल उच्च न्यायालयाचा निकाल आला. यामध्ये न्यायालयाने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकीवर तात्पुरती स्थगिती …
Read More »महिलेला ब्लॅकमेल करून लैंगिक छळ केल्याप्रकरणी भाजप नेत्यावर गुन्हा दाखल
बेळगाव : बेळगावमधील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात भाजप नेते पृथ्वी सिंह आणि त्यांचा मुलगा जसवीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत विष प्राशन …
Read More »लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्वाही कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी …
Read More »कोल्हापूर येथील अत्याचार व खून प्रकरणी नराधम मामाला बेड्या
कोल्हापूर : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने …
Read More »बेळगाव येथील श्री रुद्र केसरी मठात श्री सिद्धारू महाराज पुण्यतिथी साजरी
बेळगाव : बेळगाव लक्ष्मीटेक जवळील सैनिक नगर येथील श्री रुद्र केसरी मठात आज मंगळवार रोजी श्री सिद्धारूढ महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज पहाटेपासूनच श्री सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रुद्र केशरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य हरि गुरु महाराजांच्या सानिध्यात पहाटे श्रीमूर्तीला …
Read More »कोल्हापुरातही रानटी कृत्य; दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या
कोल्हापूर : शिये (ता. करवीर) गावच्या हद्दीत एका परप्रांतीय कुटुंबातील १० वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.२२) घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रामनगर येथे गुडूसिंग अग्रहरी हे आपली पत्नी आणि ५ मुले यांच्यासह राहतात. ते …
Read More »सदलगा येथे सिलेंडर स्फोट; एकाचा जागीच मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बिड, महाराष्ट्रातील सूर्यकांत शेळके (५५) यांचा मृत्यू झाला. ज्ञानोदय हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलेंडरच्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे …
Read More »हिंदू हेल्पलाईनकडून जखमी वानराला जीवदान
निपाणी (वार्ता) : तवंदी गावाशेजारी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याजवळ हिंदू हेल्पलाईनचे कार्यकर्ते सुमित पाटील यांना वानर जखमी अवस्थेत आढळून आले. वानराला कुत्र्याच्या झुंडीचा त्रास होत होता. यावेळी सुमित पाटील यांनी कुत्र्याच्या झुंडीपासून वानराला सोडवून या वानराला सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यानंतर वैद्यकीय उपचार करून परिसरात सोडून देण्यात आले. घटनेची माहिती पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta