येळ्ळूर : श्री ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीचा सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 13/8/2024 रोजी सकाळी ठीक 8.00 वा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 6/8/2024 रोजी श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यालयात बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीमध्ये पुढील विषयावर चर्चा होऊन मंगळवार दिनांक 13/8/2024 …
Read More »दलित अध्यक्षांना अपमानास्पद वागणुकीचा निषेध
निपाणी दलित बांधवांची बैठक ; ग्राम पंचायत अध्यक्षांचा हक्क हिरावला निपाणी (वार्ता) : यरनाळ येथील ग्रामपंचायतची नवीन इमारत मनरेगांमधून बांधण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये ग्रामपंचायत अध्यक्षांचे नाव छापणे आवश्यक होते. पण लोकप्रतिनिधींनी सदरच्या अध्यक्षा या दलित असल्याने त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांना कार्यक्रमापासून बाजूला ठेवले. त्यामुळे दलित महिलांच्या …
Read More »बिहारमध्ये सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू
पाटणा : बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णायात नेण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात …
Read More »तुंगभद्रा धरणाचे १९ वे गेट गेले वाहून
नदीपात्रातील नागरिक चिंतेत; लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, तज्ञांची समिती तातडीने रवाना बंगळुरू : कोप्पळ तालुक्यातील मुनिराबाद जवळील तुंगभद्रा जलाशयाचा १९ वा क्रस्ट गेट तुटून नदीत पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, गेटची साखळी लिंक तुटल्याने नदीपात्रातील नागरिक चिंतेत आहेत. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुंगभद्रा जलाशय फुटला. नदीपात्रातील नागरिकांना सावधगिरीचा …
Read More »वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चौगुले परिवाराकडून १२५ रोपांची भेट
निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी अर्जुनी शाळेचे शिक्षक, पर्यावरणप्रेमी नामदेव चौगुले यांनी वडील वारकरी विठोबा लक्ष्मण चौगुले यांचे स्मरणार्थ १२५ रोपांची अनोखी भेट देऊन नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुर्वी नामदेव चौगुले यांनी निपाणी शहर व परिसरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून रोपांचे …
Read More »न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्वाची
राजू पोवार; ढोणेवाडी शाखेचा वर्धापनदिन निपाणी (वार्ता) : उस, सोयाबीन पिकाला हमीभाव मिळण्यासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा. यंदाच्या उसाला प्रति टन ५५०० रुपये दर मिळावा. पुढील काळात न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांची एकजूट …
Read More »कोनेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : शेतात काम करत असताना थेट खराब झालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 10 रोजी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, भरमा पावशे हे आपल्या पत्नीसह शेतात काम करत होते. पण अनावधानाने त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याचे लक्षात आल्याने …
Read More »नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी कोल्हापूर : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्याने काम थांबले ही अडचण येवू देणार नाही, निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. …
Read More »बाप्पाच्या आगमनाची चाहूल, बेळगावच्या राजाचे मुहूर्तमेंढ मोठ्या दिमाखात संपन्न
बेळगाव : नवसाला पावणारा राजा अशी ख्यात असलेल्या बेळगावच्या राजाचे आज 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गणेश मंडप मुहूर्तमेंढ संपन्न झाले. बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बेळगावच्या राजाचे गणेश मंडप मुहूर्तमेंढ पूजन रविवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, माजी आमदार अनिल बेनके व …
Read More »वाढदिवसाचे औचित्य साधून केली रस्त्याची डागडूजी!
खानापूर : अनेक जण वाढदिवसाचे औचित्य साधून पार्टी करण्यासह इतर कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र हलगा येथील ग्राम पंचायतीचे सदस्य रणजीत पाटील यांनी वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन रविवारी रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेतले त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हलशी ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta