बेळगाव : श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (बॅग) वितरण करत आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एसडीएमसी सदस्या सौ. पौर्णिमा मोहिते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »मटण खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायचूर : रायचूर जिल्ह्यातील सिरावर तालुक्यातील कल्लूर गावात मटण खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. भीमन्ना (60), इरम्मा (54), मल्लेश (19) आणि पार्वती (17) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मल्लम्माची प्रकृती चिंताजनक असून तिला रायचूर येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मटण शिजवताना सरडा पडल्याचा संशय …
Read More »पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल डॉ. समिरा चाऊस यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील विद्या संवर्धक मंडळ संचलित सी. बी. एस. ई. इंग्रजी शाळेतील प्राचार्या डॉ. समीरा फिरोज चाऊस यांनी पीएचडी पदवी मिळविली आहे. संस्थेतर्फे त्यांचा सीईओ डॉ. सिदगौडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. समिरा चाऊस यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात ‘ए स्टडी ऑन युटीलायझेशन …
Read More »संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना निपाणीतून पाठिंबा
निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या भविष्यातील सर्व लढ्यांना निपाणी भाग मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला. यावेळी मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे …
Read More »गळतगा, मानकापूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती
निपाणी (वार्ता) : गळतगा आणि मानकापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गळतगा येथील ग्राम पंचायत कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार- वड्डर, ग्रामपंचायत अध्यक्ष राजु पाटील, उपाध्यक्ष लखव्वा हुनसे, …
Read More »पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस : सर्वत्र अलर्ट जाहीर?
बेंगळुरू : येत्या तीन दिवस राज्याच्या किनारपट्टी, डोंगराळ प्रदेश आणि उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या तीन दिवसांत किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड आणि उडुपीमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शिमोग्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »राज्यपालांच्या नोटीसला मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप; नोटीस मागे घेण्याचा ठराव
बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) बेकायदेशीर जमीन वाटप घोटाळ्याबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिलेल्या नोटीसला गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र आक्षेप घेण्यात आला. आज मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुडा घोटाळ्याबाबत राज्यपालांनी बजावलेली नोटीस मागे घेण्याची मागणी करण्याचा निर्णय …
Read More »मंत्रिमंडळातीस सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीर
कावेरी निवासस्थानी अल्पोपहार बैठक बंगळूर : मुडा घोटाळाप्रकरणी अडचणीत असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सर्व मंत्र्यांनी एकमताने घेतला आहे. मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवायला हवा, असे सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या समर्थनार्थ उभे …
Read More »येळ्ळूर येथील 30 वर्षाचा सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा वाद निकालात!
बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौक (लक्ष्मी स्थळ) येथील 30 एक वर्षे वादात असलेल्या सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा आज येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने निकाल लावण्यात आला. येळ्ळूर ग्राम पंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील असताना या जागेच्या प्रश्नाला स्थानिक लोकांना नोटीसा पाठवून त्यांच्या जागेचे कागद पत्र मागून घेऊन स्थळाची पाहणी करून तेथील …
Read More »देवाच्या नावाने प्राण्यांचा बळी देऊ नका : दयानंद स्वामीजी
बेळगाव : पशुबळी बंदीसाठी जनजागृती केल्यामुळे वडगावच्या ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रेत पशुबळी पूर्णपणे रोखण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया जागतिक प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली. बेळगाव शहरात होणाऱ्या अनेक यात्रांपैकी मोठ्या प्रमाणात भरविल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेत यंदा प्रथमच पशुबळी प्रथा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta